'तो' सलग १० दिवस PUBG खेळला, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 11:36 AM2019-01-11T11:36:27+5:302019-01-11T11:38:55+5:30
तरुणाईत सध्या पबजीची प्रचंड पाहायला मिळते
नवी दिल्ली: सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. पबजी खेळण्याची सवय जम्मू-काश्मीरमधील अशाच एका तरुणाला महागात पडली आहे. सलग 10 दिवस पबजी खेळल्यानं तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे आता त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. हा तरुण फिटनेस ट्रेनर असल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये राहणारा एक फिटनेस ट्रेनर सलग 10 दिवस पबजी खेळत होता. यामुळे त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला. हा तरुण मिशन पूर्ण करण्यासाठी सलग 10 दिवस पबजी खेळत होता. मात्र त्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. पबजीच्या अतिरेकामुळे मानसिक स्थिती बिघडल्याचं हे जम्मू-काश्मीरमधील पहिलं उदाहरण नाही. याआधी अशा प्रकारच्या 6 घटना समोर आल्या आहेत. यूएनआय या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
तरुणाची मानसिक स्थिती अद्यापही अस्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तरुणाचं मानसिक संतुलन काही प्रमाणात बिघडल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. 'रुग्ण त्याच्या कुटुंबाला, नातेवाईकांना ओळखतो आहे. मात्र त्याच्या डोक्यावर पबजीमुळे प्रचंड परिणाम झाला आहे,' असं डॉक्टर म्हणाले. पबजीवर बंदी घालण्याची मागणी जम्मूतील अनेकांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे केली आहे.