रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सादर, मोदींनी दिला थांबण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 05:59 AM2017-08-24T05:59:00+5:302017-08-24T05:59:00+5:30

चार दिवसांत झालेल्या दोन रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारत, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देऊ केला. मात्र, त्यांनी राजीनामा स्वीकारला नसून, प्रभू यांना ‘थांबा’ असा सल्ला दिला आहे.

Railway Minister Suresh Prabhu's resignation to Prime Minister Narendra Modi, Modi advised him to stop | रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सादर, मोदींनी दिला थांबण्याचा सल्ला

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सादर, मोदींनी दिला थांबण्याचा सल्ला

Next

नवी दिल्ली : चार दिवसांत झालेल्या दोन रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारत, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देऊ केला. मात्र, त्यांनी राजीनामा स्वीकारला नसून, प्रभू यांना ‘थांबा’ असा सल्ला दिला आहे.
उत्तर प्रदेशात १९ आॅगस्ट रोजी उत्कल एक्स्प्रेस रुळांवरून घसरून २३ जण ठार व ४00 लोक जखमी झाले. त्यानंतर, बुधवारी पुन्हा उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातात ७0 हून अधिक प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी राजीनामा दिला.
त्यानंतर, काही तासांनी सुरेश प्रभू यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांनीही राजीनामाही सादर केला. मात्र, तो न स्वीकारता मोदी यांनी त्यांना थांबण्यास सांगितले आहे. स्वत: सुरेश प्रभू यांनीच टिष्ट्वटरवरून ही माहिती दिली. ते म्हणाले की, या अपघातांमुळे आपण अतिशय दु:खी आहोत. जखमी झालेल्यांचे, तसेच मृतांच्या नातेवाईकांचे दु:ख पाहून मला त्रास झाला आहे. अपघात टळावेत व जनतेला चांगली रेल्वेसेवा मिळावी, यासाठी मी घाम गाळला व रक्त आटवले. रेल्वेत सुधारणेसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पावले टाकली. मात्र, अपघातांची जबाबदारी स्वकारून मी राजीनामा सादर केला आहे.

कैफियत एक्स्प्रेस डम्परवर आदळली
आझमगडहून दिल्लीला निघालेली कैफियत एक्स्प्रेस आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास औरैया जिल्ह्यातील पाटा व अचलडा स्टेशनांच्या दरम्यान, एका वाळू भरलेल्या ट्रकवर आदळली. त्यामुळे गाडीचे नऊ डबे रुळांवरून घसरले.
जखमी झालेल्या ७0 प्रवाशांपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर उत्तर भारतातील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले.

नितीन गडकरींकडे जाणार खाते?
खातेबदलाच्या वेळी प्रभू यांचा राजीनामा स्वीकारला जाईल व ते खाते नितीन गडकरी यांना दिले जाईल, अशी चर्चा आहे. त्यासाठी रस्ते, जलवाहतूक व रेल्वे अशा सर्व पायाभूत सुविधांचे मिळून एक मंत्रालय निर्माण केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: Railway Minister Suresh Prabhu's resignation to Prime Minister Narendra Modi, Modi advised him to stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.