नोटाबंदी निर्णयाची वर्षपूर्ती- राजस्थानमध्ये 50 हजार लोक गाणार वंदे मातरम्

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 09:40 AM2017-11-04T09:40:38+5:302017-11-04T09:43:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.

In Rajasthan, 50 thousand people will sing Vande Mataram | नोटाबंदी निर्णयाची वर्षपूर्ती- राजस्थानमध्ये 50 हजार लोक गाणार वंदे मातरम्

नोटाबंदी निर्णयाची वर्षपूर्ती- राजस्थानमध्ये 50 हजार लोक गाणार वंदे मातरम्

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.नोटाबंदी निर्णयाची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी राजस्थानच्या वसुंधरा राजे सरकारने खास तयारी केली आहे.

जयपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. नोटाबंदी निर्णयाची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी राजस्थानच्या वसुंधरा राजे सरकारने खास तयारी केली आहे. राजस्थानमध्ये नोटाबंदीचं एक वर्ष साजरं केलं जाणार आहे. जयपूरच्या सवाई माधोसिंह स्टेडिअममध्ये यानिमित्त एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ५० हजार लोक एकत्रित वंदे मातरम् आणि राष्ट्रगीत गाणार आहेत.

विरोधी पक्षांनी वसुंधरा राजे सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. 'सरकार आपली नामुष्की झाकायला अति राष्ट्रवादाला उत्तेजन देत आहे,' असा आरोप विरोधकांनी केला आहे. वसुंधरा राजे यांच्या या निर्णयाच्या तीनच दिवस आधी जयपूर पालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळी काम सुरू करण्यापूर्वी आणि निघताना राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् गाण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नोटाबंदी वर्षपूर्तीच्या या कार्यक्रमाचे आयोजन युवा आणि क्रीडा विभागांतर्गत असलेलं राजस्थान युथ बोर्ड करत आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम तरूणांमध्ये नैतिक मूल्यं रुजवतात, असं राजस्थान युथ बोर्डाचे उपाध्यक्ष संदीप यादव यांनी म्हंटलं. आरएसएसचे समर्थन असणारी हिंदू आध्यात्मिक आणि सेवा संघटनासुद्धा या कार्यक्रमाला सहकार्य करत आहे.
 राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असणार आहेत. संगीतकार कल्याणजी यांचा एक हिंदी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमही यावेळी सादर होणार आहे. या दोन तासांच्या कार्यक्रमात एक योग सेशनही होणार आहे. परिवार, पर्यावरण व राष्ट्रासाठी प्रेम निर्माण करणं, हा या कार्यक्रमामागील हेतू आहे. 

काँग्रेस साजरा करणार काळा दिवस 
8 नोव्हेंबर रोजी भाजपा सरकारकडून नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी कार्यक्रम आखले जात आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याच्या तयारीत आहे. 
 

Web Title: In Rajasthan, 50 thousand people will sing Vande Mataram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.