Ayodhya Ram Mandir : राम कृपेनं शिवसेना-भाजपातील मतभेद दूर होतील - सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 02:58 PM2018-11-24T14:58:44+5:302018-11-24T15:47:35+5:30
Ayodhya Ram Mandir : प्रभू राम कृपेने भाजपा-शिवसेनेतील मतभेद दूर होतील,अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
मुंबई - प्रभू राम कृपेने भाजपा-शिवसेनेतील मतभेद दूर होतील,अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांनी हे विधान केले आहे.
प्रभू रामाचं मंदिर होण्यासाठी आमच्यातील छोट्या-मोठ्या गोष्ट असतील तर दूर होतील. शिवाय, युती होण्याचा मार्ग स्टेट हायवे होता आता तो राष्ट्रीय महामार्ग होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुढे ते असेही म्हणाले की, राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दाच असू शकत नाही. श्री राम मंदिर हा मुद्दा मतांसाठी नाही, ते राष्ट्रीयत्व आहे. कोट्यवधी हिंदूंची ती आस्था आहे. राम मंदिर निर्माणावरुन दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा, कुरघोडी असूच शकत नाही. कारण दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक समानता आहे.
#RamMandir : शेकडो मुस्लिमांनी सोडली अयोध्या; विहिंप आणि शिवसेनेच्या कार्यक्रमांमुळे तणाव https://t.co/1ccG9kHnCa@uddhavthackeray#AyodhyaRamMandir
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 24, 2018
#RamMandir : शेकडो मुस्लिमांनी सोडली अयोध्या; विहिंप आणि शिवसेनेच्या कार्यक्रमांमुळे तणाव https://t.co/1ccG9kHnCa@uddhavthackeray#AyodhyaRamMandir
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 24, 2018
राम मंदिर निर्माणासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले असतील तर यामध्ये गैर काहीच नाही. राम मंदिर व्हावं ही देशातील प्रत्येक हिंदूंच्या मनातील भावना आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ज्या गोष्टीसाठी आग्रही आहेत, त्या गोष्टीसाठी उद्धव ठाकरेदेखील आग्रही आहेत,असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, 'आधी मंदिर, नंतर सरकार', उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेबाबत विचारलं असता मुनगंटीवार म्हणाले की, निवडणुका घेऊ नये किंवा शिवसेना-भाजपाने एकत्र येऊ नये,असा उद्धव ठाकरेंचा विचार नसावा, असा दावा त्यांनी केला.
शिवाय, राम मंदिर हा राजकारणाचा नाही तर राष्ट्रकारणाचा मुद्दा आहे. मंदिर हा एका पक्षाचा विषय नाहीच. तर यासाठी सर्वपक्षीयांची बैठक घेऊन एकमत केलं पाहिजे, अशीही इच्छा त्यांनी बोलून दाखवली.