राम रहिमच्या डे-यात जवानांचा डेरा, घेतली झाडाझडती ; आतील दृश्य अद्भुत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:56 AM2017-09-09T00:56:01+5:302017-09-09T00:56:39+5:30
बलात्कार प्रकरणात दोषी राम रहिमच्या तब्बल ८00 एकरात वसलेल्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयाची सशस्त्र सुरक्षा दलाचे जवान व पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाडाझडती घेतली
सिरसा (हरियाणा) : बलात्कार प्रकरणात दोषी राम रहिमच्या तब्बल ८00 एकरात वसलेल्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयाची सशस्त्र सुरक्षा दलाचे जवान व पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाडाझडती घेतली आणि नोंदणी न झालेल्या असंख्य लक्झरी व मॉडिफाइड कार्स, चलनातून बाद झालेल्या नोटा, अनेक लॅपटॉप व कॉम्प्युटर्स, हार्ड डिस्क्स, कसलीही लेबल नसलेली औषधे आदी साहित्य जप्त केले. डेरा परिसरात १६ नाके तयार करण्यात आले असून निमलष्करी दलाच्या ४१ तुकड्या (सुमारे ५ हजार जवान) सिरसामध्ये तैनात आहेत.
डेºयाच्या तपासासाठी बॉम्बशोधक पथके, श्वान पथके, अनेक लोहार तसेच चित्रण करण्यासाठी व्हिडीओग्राफर्स यांची मदत घेण्यात आली. लोहारांच्या मदतीने अनेक खोल्या उघडण्यात आल्या. आत शस्त्रे वा स्फोटके असण्याच्या शक्यतेमुळे बॉम्बशोधक पथके व श्वान पथके बोलावण्यात आली होती. चार जेसीबी मशिन्स, ट्रॅक्टर, खोदकाम करण्याचे साहित्य हेही आणण्यात आले होते.
तेथे शाळा, महाविद्यालय, अम्युजमेंट पार्क, मॉल, दुकाने, रुग्णालय याबरोबरच मसाला बनवण्याची फॅक्टरी, चित्रपटगृह असल्याचे आढळून आले. याशिवाय राम रहीमच्या गुहेकडे जाणारा गुप्त मार्ग शोधण्यात आला. तेथे अनेक एकरांवर सेंद्रिय शेती होते. आतमध्ये हजारांहून अधिक मजूर व कामगार आतापर्यंत काम करीत होते.
या सर्च आॅपरेशनमध्ये येथील काही खोल्या सील करण्यात आल्या आहेत. ओबी व्हॅन, हजार रुपयांच्या ७००० बाद झालेल्या नोटा, १२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कर्नाल आणि सोनिपत येथून न्यायवैद्यक पथक दाखल झाले होते. न्यायवैद्यक तज्ज्ञांना उत्तराखंडातून बोलाविण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. एस. पवार यांच्या देखरेखीखाली या तपासाची व्हिडीओग्राफी आणि निरीक्षण केले जात आहे. हरियाणा उच्च न्यायालयाने न्या. पवार यांची नियुक्ती केली आहे. डेरा मुख्यालयाकडे जाणाºया रस्त्यांवर आज संचारबंदी होती. रस्ते बंद करण्यात आले होते. कुणालाही डेराकडे जाण्यास परवानगी नव्हती. (वृत्तसंस्था)
डेरा सच्चा सौदाचा हा परिसर ८०० एकरचा आहे. तपासणीसाठी एका वरिष्ठ अधिकाºयाच्या नेतृत्वात दहा विभाग करण्यात आले होते. या प्रत्येक विभागावर एका अधिकाºयाचा अंकुश होता. सिरसा जिल्ह्यात १० सप्टेंबरपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अफवा रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. शाह सतनाम सिंह चौकात म्हणजे मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर पत्रकारांना रोखण्यात आले होते. डेराच्या परिसरात मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यात विशेष टीमचे ५० कमांडो आहेत.