मोदींच्या स्वप्नातील रो-रो सेवा अखेर त्यांच्याच हस्ते सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 07:14 AM2017-10-23T07:14:24+5:302017-10-23T07:15:27+5:30

गुजरात निवडणूक जवळ येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात कार्यक्रमांचा धडाका लावला असून, रविवारी त्यांनी सौराष्ट्र ला दक्षिण गुजरातशी जलमार्गाने जोडणा-या ‘रोल आॅन-रोल आॅफ’ या आपल्या स्वप्नातील नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ केला.

Ro-Ro service for Modi's dream is finally started! | मोदींच्या स्वप्नातील रो-रो सेवा अखेर त्यांच्याच हस्ते सुरू!

मोदींच्या स्वप्नातील रो-रो सेवा अखेर त्यांच्याच हस्ते सुरू!

Next

घोघा/दाहेज (गुजरात) : गुजरात निवडणूक जवळ येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात कार्यक्रमांचा धडाका लावला असून, रविवारी त्यांनी सौराष्ट्र ला दक्षिण गुजरातशी जलमार्गाने जोडणा-या ‘रोल आॅन-रोल आॅफ’ या आपल्या स्वप्नातील नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी भावनगरच्या शंभर दृष्टिहीन मुलांसोबत घोघा ते दाहेजपर्यंत नौकेतून सैरही केली.
>काय आहे
रो-रो सर्व्हिस...
घोघा ते दाहेजदरम्यानच्या ६५० कोटी रुपये खर्चाच्या ‘रो-रो’ नौका सेवेमुळे प्रवासासोबत वाहन आणि मालाची वाहतूकही करता येणार आहे.
>त्या राज्यांना केंद्र
छदामही देणार नाही
केंद्र सरकारचा सर्व पैसा लोककल्याणासाठी खर्च केला जाईल व विकासाला विरोध करणाºया राज्यांना केंद्राकडून एक छदामही दिला जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा येथे दिला.
>वेळ वाचणार
सौराष्टÑ आणि दक्षिण गुजरातदरम्यान रस्त्याने प्रवास करण्यासाठी दहा तास लागतात. दाहेज ते घोघादरम्यानचे अंतर रस्तेमार्गे ३१० किलोमीटर आहे. या जलमार्गाने हे अंतर ३१ किलोमीटरवर येईल आणि वेळही कमी लागेल.
>150 मोठ्या वाहनांची वाहतूक करता येणार
>1000 लोक एकाच वेळी बोटीतून प्रवास करू शकतील
>600 रुपये सध्या या नौका सेवेचे भाडे आहे.

Web Title: Ro-Ro service for Modi's dream is finally started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.