ेॅेसुधारीत-देवस्थान समितीतर्फे सीपीआरसाठी १५ लाख सुपूर्द -मुख्यमंत्री सहाय्यता निधी २५ लाख
By admin | Published: January 6, 2017 02:13 AM2017-01-06T02:13:00+5:302017-01-06T02:13:00+5:30
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सामाजिक बांधीलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे सार्वजनिक रुग्णालयासाठी १५ लाखांचा निधी देण्यात आला.
Next
क ल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सामाजिक बांधीलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे सार्वजनिक रुग्णालयासाठी १५ लाखांचा निधी देण्यात आला. समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत या निधीची तरतूद करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी समितीच्या झालेल्या बैठकीनंतर छत्रपती प्रमिलाराजे सार्वजनिक रुग्णालयात येणार्या रुग्णांकरीता सुविधांच्या दर्जा सुधारण्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व वैद्यकीय अधिकारी शिशीर मिरगुंडे यांच्याकडे देण्यात आला. या निधीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, सदस्या संगीता खाडे, सदस्य प्रमोद पाटील, बी. एन. पाटील, शिवाजी जाधव, सुभाष वोरा यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सचिव विजय पवार, सह. सचिव शिवाजी साळवी, अभियंता सुयश पाटील, उपअभियंता सुदेश देशपांडे, धनाजी जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.--------------------फोटो नं ०५०१२०१६-कोल-देवस्थान ओळ : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे १५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व वैद्यकीय अधिकारी शिशीर मिरगुंडे यांच्याकडे देण्यात आला. यावेळी सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील, बी. एन. पाटील, शिवाजी जाधव, सुभाष वोरा, विजय पवार, शिवाजी साळवी, सुयश पाटील, सुदेश देशपांडे, धनाजी जाधव उपस्थित होते. --------------------इंदुमती