काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 03:12 PM2024-05-08T15:12:12+5:302024-05-08T15:12:22+5:30

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी भारतीयांची चायनीज, आफ्रीकन आणि अरब लोकांची तुलना केल्याने नवा वाद पेटला आहे.

Sam Pitroda News : Congress is 'shop of hate', BJP aggressive on Sam Pitroda's statement; Demand for suspension | काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी

काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी

Sam Pitroda News :  इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. आधी त्यांनी संपत्तीच्या वाटणीबाबत केलेल्या वक्तव्याने वाद पेटला होता, त्यानंतर आता त्यांनी देशातील नागरिकांच्या रंग आणि दिसण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात त्यांनी भारताच्या विविध भागात राहणाऱ्या लोकांची चायनीज, आफ्रीकन आणि अरब लोकांशी तुलना केली. या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झाली असून, पित्रोदा यांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे.

पित्रोदा यांच्या या वर्णद्वेषी टिप्पणीवरुन असामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, भाजप खासदार तेजस्वी सूर्या, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांच्यासह विविध भाजप नेते काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत. 

असामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पित्रोदांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले, 'सॅम भाई, मी उत्तर-पूर्वेत राहतो आणि भारतीयांसारखाच दिसतो. आम्ही एका विविधतेने नटलेल्या देशात राहतो. आम्ही वेगळे दिसतो, पण सर्वजण एकच आहोत. आमच्या देशाबद्दल थोडं जाणून घ्या.'

दुसरीकडे, भाजप नेते रवीशंकर प्रसाद म्हणतात की, 'यावरुन सिद्ध होते की, सॅम पित्रोदा यांना आपल्या भारत देशाबद्दल काहीच माहिती नाही. आता मला समजले की, राहुल गांधी मूर्खपणाची वक्तव्ये का करतात, कारण सॅम पित्रोदा राहुल गांधींचे सल्लागार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी तर पित्रोदांची तुलना थेट चर्चिलशी केली. तेजस्वी सुर्या म्हणाले की, 'कांग्रेस हमेशा ओजी(ओरिजनल) ब्रेकिंग भारतीय पक्ष राहिला आहे. अशाप्रकारची टीका चर्चिलने आपल्या देशाबद्दल केलेल्या टीकेसारखीच आहे. यात काही आश्चर्य नाही की, राहुल गांधी पित्रोदांकडूनच मार्गदर्शन घेतात.'

भाजपे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी पित्रोदांना निलंबित करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, ही वर्णद्वेषी आणि अपमानकारक टिप्पणी आहे. अशाप्रकारच्या वक्तव्यावरुन कळते की, काँग्रेसच्या 'मोहब्बत की दुकान'मध्ये 'नफरत का सामान' भरलेले. जोपर्यंत काँग्रेस यावर स्पष्टीकरण देत नाही, तोपर्यंत सॅम पित्रोदा यांना पक्षातून निलंबित करावे. राहुल गांधींचे गुरू अशाप्रकारची वक्तव्ये करतात, अशी टीका त्यांनी केली.  

Web Title: Sam Pitroda News : Congress is 'shop of hate', BJP aggressive on Sam Pitroda's statement; Demand for suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.