लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटला मोठे यश! 2018 मध्ये तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 12:20 PM2018-12-31T12:20:53+5:302018-12-31T12:23:47+5:30

गेल्या काही दशकांपासून काश्मीर खोऱ्यात उच्छाद घालत असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

Security forces neutralize 311 terrorists this year | लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटला मोठे यश! 2018 मध्ये तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान 

लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटला मोठे यश! 2018 मध्ये तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान 

Next
ठळक मुद्देसरत्या वर्षात दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेला मोठे यश मिळाले या वर्षी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात आतापर्यंत झालेल्या चकमकींमध्ये लष्कराने तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले सुरक्षा दलांमधील समन्वय आणि लष्कराला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी दिलेल्या मोकळीकीमुळे या वर्षभरात 311 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश

श्रीनगर  - गेल्या काही दशकांपासून काश्मीर खोऱ्यात उच्छाद घालत असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या वर्षी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात आतापर्यंत झालेल्या चकमकींमध्ये लष्कराने तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट यांनी आज ही माहिती दिली. 

लष्कराने दहशतवाद्यांविरोधात उघडलेल्या व्यापक मोहिमेची माहिती देताना 15 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट म्हणाले की,''विविध सुरक्षा दलांमधील समन्वय आणि लष्कराला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी दिलेल्या मोकळीकीमुळे या वर्षभरात 311 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.'' काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या तुलनेत यावर्षी अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.  





काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारतील लष्कराकडून वर्षभरात व्यापक कारवाई करण्यात आली. ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या या कारवाईंमध्ये लष्कर ए तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या अनेक कमांडरना कंठस्नान घालण्यात आले. तसेच शोधमोहिमा राबवून इतरही अनेक लहान मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यामुळे काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.  

Web Title: Security forces neutralize 311 terrorists this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.