ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 17:48 IST2018-12-05T17:44:25+5:302018-12-05T17:48:58+5:30
'सर्जनप्रेरणा आणि कवीत्वशोध'साठी होणार गौरव

ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
मुंबई: ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्जनप्रेरणा आणि कवीत्वशोध यासाठी मधुकर पाटील यांना पुरस्कार दिला जाणार आहे. साहित्य अकादमीनं आज 24 भाषांमधील पुरस्कार जाहीर केले. सात कवितासंग्रह, सहा कादंबऱ्या, सहा लघुकथा, तीन साहित्य समीक्षा आणि दोन निबंधांची निवड साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली.