धक्कादायक! एका वर्षात 3 हजार कॉल्स, एकतर्फी प्रेमातून शैलजाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 09:02 AM2018-06-25T09:02:50+5:302018-06-25T09:03:03+5:30

हत्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. आरोपी मेजर निखिल राय हा मेजर अमित द्विवेदीच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम करत होता.

Shailja Murder case: major nikhil rai handa had called shailja dwivedi at least 3000 times this year | धक्कादायक! एका वर्षात 3 हजार कॉल्स, एकतर्फी प्रेमातून शैलजाची हत्या

धक्कादायक! एका वर्षात 3 हजार कॉल्स, एकतर्फी प्रेमातून शैलजाची हत्या

googlenewsNext

नवी दिल्ली- सहकारी मेजरच्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी मेजर निखिल राय हांडा याला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु या हत्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. आरोपी मेजर निखिल राय हा मेजर अमित द्विवेदीच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम करत होता. एका मुलाची आई असलेल्या शैलजाबरोबर निखिल लग्न करू इच्छित होता. परंतु शैलजानं त्याला वारंवार विरोध केला होता. या हत्येला अपघाताचं स्वरूप देण्यासाठी आरोपी निखिलनं गाडीच्या खाली तिला चिरडलं असून, या प्रकरणात पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी शैलजाच्या मोबाईलचा सीडीआर काढला आहे. त्यावरून शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान शैलजाचं मेजर निखिल हांडाबरोबर बोलणं झालं होतं. इतकेच नव्हे, तर हांडानं शैलजाला वर्षभरात 3 हजार कॉल्स केल्याचंही उघड झालं आहे. त्यानंतर आता पोलीस सर्व बारीकसारीक धागेदोरे जोडून पुरावे गोळा करत आहेत. एका रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही शैलजाला निखिल भेटण्यास आल्याचं दिसत आहे. त्याच वेळी निखिल हांडाबरोबर शैलजा रुग्णालयाच्या बाहेर गेली, ज्या गाडीत शैलजा होती, ती एक पांढ-या रंगाची कार होती.

शनिवारी दुपारी बराड स्क्वेअर परिसरात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली होती. सुरुवातीचे काही तास या मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती. मात्र संध्याकाळी साडे चारच्या सुमारास मेजर अमित द्विवेदी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यावर हा मृतदेह शैलजाचाच असल्याचं निष्पन्न झालं. 

Web Title: Shailja Murder case: major nikhil rai handa had called shailja dwivedi at least 3000 times this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.