कोकण रेल्वे मार्गावर नवीन २१ स्थानके, रोहा ते ठोकूर ७४१ किमी मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामाने घेतला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 04:35 PM2018-01-17T16:35:32+5:302018-01-18T12:55:04+5:30
आधुनिकतेची कास धरून अन कोकणासह सामान्य कर्नाटकी माणसाचे हित जपून कोकण रेल्वे मार्गावर लवकरच २१ नवी स्थानके अन रोहा ते ठोकूर या ७४१ किमी मार्गाचे विद्युतीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे.
- नारायण जाधव
उडीपी - कोकण रेल्वे म्हटले की आठवते ती हिरव्यागर्द वनराईतून अन् डोंगर कपाऱ्या चिरत घुरांच्या रेषा काढणारी आगीनगाडी. झुक झुक आगीनगाडी धुरांचा रेंषा हवेत काढी, मामाच्या गावाला जाऊया, या गाण्याची आठवण करून देणारी रेल्वे. परंतु आता आधुनिकतेची कास धरून अन कोकणासह सामान्य कर्नाटकी माणसाचे हित जपून कोकण रेल्वे मार्गावर लवकरच २१ नवी स्थानके अन रोहा ते ठोकूर या ७४१ किमी मार्गाचे विद्युतीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर आता ३ वर्षानंतर धुरांच्या रेषा दिसणार नाहीत. दिसेल ती सुसाट धावणारी वीजे वरील रेल्वे. यामुळे नजिकच्या काळात तिच्या वेगासारखाच कोकणसह कर्नाटकचा विकासही धावेल असा विश्वास कोकण रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक मोहम्मद असीफ सुलेमान यांनी व्यक्त केला.
आपल्या या महत्त्वकांक्षी कांमाचा पाहणी दौरा पत्रकारांसाठी कोकण रेल्वे ने घडवून आणला. यांत इन्नंजे स्थानकाचे काम पाहता आले. नव्या २१ स्थानकांपैकी हे एक स्थानक आहे. कर्नाटकातील उडपी नजिकच्या ६/७ गावे या स्थानकाला जोडली जाणार आहेत. उडपी ते पडबिद्री दरम्यान हे स्थानक आकार घेत आहे. सध्या येथे थांबा आहे. त्याचे ११.२४ कोटी खर्चून कायमस्वरूपी स्थानक होत आहे. कुमटा स्थानकही अशाच प्रकारे आकार घेत आहे. या नव्या २१ स्थानकांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांची संख्या ८७ होणार आहे. तसेच दोन स्थानकांमधील अंतर १२.७५ किमी वरून ८.३ इतके कमी होऊन कोकण रेल्वेचा वेगही वाढणार आहे. या २१ स्प्रथानकांच्या प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.
या शिवाय केंद्र सरकारने देशांतील सर्वच रेल्वे नारिंगांचे विद्युतीकरणाचे काम घेतले आहे. त्या अंतर्गत कोकण रेल्वेवरील रोहा ते वेरना आणि वेरना ते ठोकूर अशा दोन टप्यात विद्युतीकरण करण्यात येत आहे. रोहा ते वेरनापर्यंतचे काम एल अँड टी आणि वेरना ते ठोकूर पर्यंतचे काम कल्पतरू कंपनीस देण्यात आले आहे. १११० कोटी रुपये या दोन्ही कामांवर खर्च केले जात आहेत. ३ वर्षात दोन्ही टप्यातील कामे पूर्ण करण्याचा मानस आहे. मार्गावरील दुर्गम भागांत यंत्र सामग्रीची नेआण करण्यासाठी मालवाहतूक रेल्वेची मदत घेण्यात येत आहे.
नवी स्थानके विद्युतीकरणाचा मोठा लाभ कोकणात आकार घेणाऱ्या बंदरे आणि उद्योगांना होणार आहे. त्यांचा वाहतूक खर्च कमीलीचा कमी होणार आहे. शिवाय कोकण रेल्वेचा विद्युतीकरणामुळे डिझेलवरील खर्चात ३०% बचत होणार आहे.
या सर्वांना पुरक म्हणून कर्नाटकातच बाली येथे सर्वात मोठा लॉजिस्टीक पार्क विकसित होत आहे. यामुळे नजिकच्या काळात कोकण रेल्वेवर कंटेनरची वाहतूक मोठ्याप्रमाणावर वाढून कोकण रेल्वेचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल असा विश्वास वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी व्यक्त केला.