Animal Abuse : कुठे चाललोय आपण?; बकरीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं फरहान अख्तर उद्विग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 03:24 PM2018-07-31T15:24:30+5:302018-07-31T15:41:54+5:30
Animal Abuse : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरनंही घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आपला संपात व्यक्त केला आहे.
मेवात - हरियाणातील मेवातमध्ये एका गरोदर बकरीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्या बकरीचा मत्यू झाला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरनंही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आपला संपात व्यक्त केला आहे. ''देशात आतापर्यंत महिला आणि लहान मुले भीतीच्या सावटाखाली जगत होते. मात्र आता बकरी आणि कुत्रेदेखील अशा घटनांचे शिकार होऊ लागले आहेत. आपल्या उत्क्रांती आणि शिक्षणात गंभीर स्वरुपात काही तरी चुकीचे घडत आहे. हे सर्व कधी संपुष्टात येणार, माहिती नाही'', अशा शब्दांत फरहाननं आपला संताप ट्विटरवर व्यक्त केला आहे.
भारतासारख्या विकसनशील देशात महिला, मुलं आणि जनावरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. फरहान अख्तरनं यापूर्वीही निरनिराळ्या सामाजिक मुद्यांवर आपली मतं प्रखरपणे सोशल मीडियावर मांडली आहेत.
Women and children living in fear of the Indian man’s power politics and sexual perversion was not enough.. now goats and dogs will too. Something has gone seriously wrong in our evolution and our education. Where’s the light at the end of this tunnel?
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) July 29, 2018
नेमकी काय आहे घटना?
हरियाणातील मेवात जिल्ह्यात गरोदर असलेल्या बकरीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केला. बकरीच्या मालकानं 26 जुलैला या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली. ज्या आरोपींविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे, ते सर्व आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. नगीना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजबीर सिंह यांनी सांगितले की, 'असलू नावाच्या व्यक्तीने 26 जुलैला ठाण्यात तक्रार नोंदवली. 25 जुलैला बकरीवर सवकर, हारून, जाफर आणि अन्य पाच जणांनी मिळून बलात्कार केला, असा आरोप असलू यांनी केला आहे'.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
Haryana: Pregnant goat died a day after allegedly being raped by 8 men in Mewat. Goat's owner (in pic) registered a police complaint on July 26. Police says, 'all accused are absconding. Medical of the dead goat will be conducted. Investigation is underway' pic.twitter.com/Ejyc6u56WT
— ANI (@ANI) July 28, 2018
Haryana: Pregnant goat died a day after allegedly being raped by 8 men in Mewat. Goat's owner (in pic) registered a police complaint on July 26. Police says, 'all accused are absconding. Medical of the dead goat will be conducted. Investigation is underway' pic.twitter.com/Ejyc6u56WT
— ANI (@ANI) July 28, 2018