किना-यावर उभे राहून लाटा बघू नका, समुद्रामध्ये उडी मारुन किनारा गाठा - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 12:52 PM2017-09-11T12:52:46+5:302017-09-11T13:11:08+5:30
माझ्या सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. तरुणाईला कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी कौशल्य विकासाला सर्वात जास्त महत्व देत आहोत.
नवी दिल्ली, दि. 11 - माझ्या सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. तरुणाईला कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी कौशल्य विकासाला सर्वात जास्त महत्व देत आहोत. नोकरी मागणारा नाही तर, नोकरी देणारा तरुणवर्ग तयार झाला पाहिजे असे मोदी म्हणाले. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागोमध्ये केलेल्या प्रसिद्ध भाषणाला आज 125 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने नवी दिल्लीत 'यंग इंडिया, न्यू इंडिया' थीमवर आधारीत विद्यार्थ्यांच्या परिषदेला मोदींनी संबोधित केले. अपयशाशिवाय यश मिळत नाही. यशाचा रस्ता अपयश बनवत, म्हणून अपयशाला घाबरु नका.
किना-यावर उभे राहून लाटा बघू नका, समुद्रामध्ये उडी मारुन किनारा गाठा. तरुणाईने नावीन्याचा शोध घेतला पाहिजे. भारतात प्रतिभेची अजिबात कमतरता नाही. आपल्या भाषणाता त्यांनी राष्ट्रपती भवनातील एका घटनेचे उदहारण दिले. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना मी राष्ट्रपती भवनात विद्यार्थ्यांचा एक प्रकल्प पाहिला. त्या विद्यार्थ्यांनी कच-यामधून नवनिर्मितीचा प्रकल्प तयार केला होता. त्या मुलांच्या कल्पनाशक्तीचे मला खरोखर कौतुक वाटले.
हा स्वच्छ भारताचा मोहिमेचा परिणाम होता असा मोदी म्हणाले. परराष्ट्र धोरणासंबंधी वन एशिया ही विवेकानंदांची संकल्पना होती. विश्व संकटात असताना त्याला मार्ग दाखवण्याची क्षमता वन एशियामध्ये आहे असे विवेकानंदांचे म्हणणे होते. आज 21 वे शतक आशियाचे खंडाचे असल्याची जगात चर्चा आहे असे मोदी म्हणाले.
त्यांनी विद्यार्थी राजकारणावरही भाष्य केले. आज विद्यार्थी राजकारण ज्या दिशेने चालले आहे तो एक चिंतनाचा विषय आहे असे मोदी म्हणाले. कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका पार पाडल्यानंतर दुस-या दिवशी काय चित्र असते. सर्वत्र कच-याचा खच पडलेला असतो. आपण आपले महाविद्यालय, विद्यापीठ स्वच्छ करण्याची मोहिम कधी हाती घेतो का ? असा सवाल त्यांनी केला.
कॉलेजमध्ये जे वेगवेगळे डे साजरे होतात. त्यांना माझा विरोध नाही. पण पंजाबच्या कॉलेजमध्ये कधी केरल डे साजरा होईल का ? जेव्हा एका राज्याचा दिवस दुस-या राज्यातल्या कॉलेजमध्ये साजरे होतील तेव्हा ख-या अर्थाने विविधतेली एकता अनुभवता येईल तसेच एक भारत, श्रेष्ठ भारत स्वप्नही साकार होईल असे मोदी म्हणाले. कल्पकतेशिवाय आयुष्य नाही, देशाची ताकत, गरज पूर्ण होईल असे काम करण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
Maine dekha hai colleges mein 'Day' manaate hain alag alag, aaj Rose Day hai...: PM Narendra Modi pic.twitter.com/dNIREAfjUH
— ANI (@ANI) September 11, 2017