भारतातील पहिल्या तृतीयपंथीय न्यायाधीशाची प्रेरणा देणारी कथा, एकेकाळी न्यायालयासमोरच मागायची भीक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 09:25 AM2017-10-17T09:25:22+5:302017-10-17T12:58:07+5:30

एकेकाळी न्यायालयासमोरच भीक मागणाऱ्या आणि आपल्यासारख्याच इतरांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी दिलेला लढा हा न्यायाधीश झालेल्या  तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) जोयिता मोंडल यांच्या कष्टाची आणि जिद्दीची पोचपावती देऊन जातो.

The story that inspires India's first tertiary judge, once in the court, begs to ask for help | भारतातील पहिल्या तृतीयपंथीय न्यायाधीशाची प्रेरणा देणारी कथा, एकेकाळी न्यायालयासमोरच मागायची भीक 

भारतातील पहिल्या तृतीयपंथीय न्यायाधीशाची प्रेरणा देणारी कथा, एकेकाळी न्यायालयासमोरच मागायची भीक 

Next

कोलकाता - एकेकाळी न्यायालयासमोरच भीक मागणाऱ्या आणि आपल्यासारख्याच इतरांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी दिलेला लढा हा न्यायाधीश झालेल्या  तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) जोयिता मोंडल यांच्या कष्टाची आणि जिद्दीची पोचपावती देऊन जातो. त्यांची ही वाटचाल अनेकांना प्रेरणा देणारीच आहे. जुलैमध्ये जोयिता मोंडल  न्यायाधीश झाल्या होत्या. उत्तर दिनाजपूर, इस्लामपूर न्यायालयात जोयिता मोंडल राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ‘विद्वान न्यायाधीश’ म्हणून कार्यरत आहेत

जोयिता मोंडल यांनी काल माध्यमांशी बोलताना आपल्या आठवणींना उजाळा दिला.  29 वर्षीय जोयंतो यांचा जन्म कोलकाता शहरात झाला. शाळेत त्यांचे जेंडर बद्दल असलेल्या शाळेच्या पूर्तता त्या करण्यास अपयशी ठरल्याने त्यांना इयत्ता 10 वी मध्ये शाळेतून काढून टाकण्यात आले होतं. 

जोयिता यांचा भिकारी तृतीयपंथी ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. एक तृतीयपंथी न्यायाधीश बनण्याचा क्षण तृतीयपंथीच नव्हे तर संपूर्ण भारतीयांसाठी सुद्धा कौतुकाचा आहे. जोयितांचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. केवळ विचारांच्या परिवर्तनामुळे आणि मनात असलेल्या जिद्दीमुळेच जीवन जगण्यासाठी भीक मागणे, भीक मागता मागता सामाजिक काम करणे आणि त्याचसोबत आपले शिक्षण सुरू ठेवणे, हे सगळे जोयिताने केले आहे. जोयिता या कोलकाता मध्ये होणाऱ्या भेदभावला कंटाळून उत्तर दिनाजपुर जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आल्या आणि परत गेल्याच नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिजडा म्हणून काम करण्याबरोबर इतर तृतीयपंथी लोकांच्या हक्कासाठी ही लढा दिला. त्यानंतर त्यांनी समाजातील प्रत्येक भेदभाव होणाऱ्या व्यक्तीसाठी लढा उभारला. त्यांनी या सर्व कामांसोबत आपले मुक्त विद्यापीठातून कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले.2010 साली त्यांना आपले मतदान कार्ड मिळाले. आपल्या जिल्ह्यात मतदान कार्ड मिळवणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी होत्या.

काही वर्षांपूर्वी जोयिता यांनी समाजातील वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेल्या लोकांसाठी स्वतःची एक संस्थाही चालू केली. जिल्यातील हजारो व्यक्तींना त्यांची संस्था मदत पोहोचवते. आतापर्यंत मिळालेल्या यशा व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या तृतीयपंथीपणामुळे हॉटेल मध्ये रूम न मिळाल्यामुळे बस स्टँड वर झोपावं लागल्याच्या वाईट स्मृतींना मुलाखतीत उजाळा दिला. कोलकाता येथील घर सोडल्यानंतर 10 वर्षांनी आता जुलैमध्ये जॉईता यांची दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. 

विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी त्या झोपत असलेल्या बस स्टँड पासून त्यांची निवड झालेले न्यायालय 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. असे त्यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलखातीत म्हटले आहे. 8 जुलै या दिवशी जॉईता यांना इस्लामपूर सब-डिव्हिजनल लीगल सर्व्हिस कमिटीने न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. आपल्या वाट्याला आलेले जीवन इतर तृतीयपंथी लोकांच्या वाट्याला येऊ न देण्यासाठी जोयिता नेहमी प्रयत्नशील असतात.
जॉईतांनी इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, माझ्या यशाबद्दल मला अभिमान आहे. न्यायाधीश म्हणून माझी झालेली निवड ही लिंगभेद करणाऱ्या समाजाला मिळालेली चपराक आणि संदेशही आहे. तृतीयपंथी समाजातील 2-3 टक्के लोकांनाही नोकऱ्या मिळावून देता आल्या तर मला माझ्या पदाबद्दल समाधान वाटेल. कारण इतर जे तृतीयपंथी 100-200 रुपयांसाठी सेक्स वर्कर्सचं काम करतात, त्यांनाही या त्रासापासून मुक्तता मिळेल व ते सुखाची झोप घेऊ शकतील.’ त्या पुढे बोलताना म्हणाल्या की ‘मी जरी आता वातावणूकुलीत गाड्यामध्ये फिरत असले तरी माझ्या समाजातील इतर तृतीयपंथीना दिवसा भीक आणि सेक्स वर्कर्स म्हणूनच काम करावे लागत आहे. 

Web Title: The story that inspires India's first tertiary judge, once in the court, begs to ask for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.