एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या लाचखोर पर्यवेक्षिकेला अटक

By admin | Published: May 2, 2016 08:34 PM2016-05-02T20:34:06+5:302016-05-02T20:34:06+5:30

जळगाव : अंगणवाड्यांना पुरवलेल्या पोषण आहाराच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी बचतगट चालकाकडून ३६ हजार २०० रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका आशा तेजकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले.

Strict Observer of Integrated Child Development Services Scheme | एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या लाचखोर पर्यवेक्षिकेला अटक

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या लाचखोर पर्यवेक्षिकेला अटक

Next
गाव : अंगणवाड्यांना पुरवलेल्या पोषण आहाराच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी बचतगट चालकाकडून ३६ हजार २०० रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका आशा तेजकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले.
या प्रकरणातील तक्रारदार हे आसोदा (ता.जळगाव) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या बचतगटाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या कार्यालयाशी ६ अंगणवाड्यांना पूरक पोषण आहार शिजवून पुरवण्याचा करार केलेला आहे. या बचतगटाने पुरवलेल्या ८ महिन्यांचा पोषण आहाराच्या १ लाख ७७ हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी तसेच या कामाचे पुढचे धनादेश वेळेवर काढण्याच्या मोबदल्यात पर्यवेक्षिका आशा तेजकर यांनी ३४ हजार रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.
निवासस्थानी लावला सापळा
तक्रारीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी तेजकर यांच्या निवासस्थानाजवळ सापळा लावला होता. त्यात त्यांनी तक्रारदाराकडून धनादेश देण्यापोटी ३६ हजार २०० रुपयांची लाच मागून लाचेची रक्कम स्वत स्वीकारली. या वेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, १३, (१) (ड) सह १३ (२) ला.प्र.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Strict Observer of Integrated Child Development Services Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.