फटाके फोडण्यासाठी फक्त दोन तास; सुप्रीम कोर्टाने ठरवून दिली ही वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:02 AM2018-10-23T11:02:19+5:302018-10-23T12:06:01+5:30

फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे.

Supreme Court allows bursting of crackers on diwali from 8 PM to 10 PM | फटाके फोडण्यासाठी फक्त दोन तास; सुप्रीम कोर्टाने ठरवून दिली ही वेळ

फटाके फोडण्यासाठी फक्त दोन तास; सुप्रीम कोर्टाने ठरवून दिली ही वेळ

googlenewsNext

नवी दिल्ली - फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णतः बंदी लागू करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. दरम्यान, फटाक्यांच्या विक्रीसाठी काही अटीदेखील लागू करण्यात आल्या आहेत. फटाक्यांची ऑनलाइन विक्री केली जाऊ शकत नाही, असेही कोर्टानं सुनावणीदरम्यान स्पष्ट केले आहे. तसंच केवळ परवानाधारक व्यापारीच फटाक्यांची विक्री करू शकतात. काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपलेला असताना कोर्टानं हा निर्णय दिला आहे.  

वायू प्रदूषण रोखण्यासाठी देशभरात फटाक्यांचे उत्पादन-विक्री आणि फटाके फोडण्यावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं मंगळवारी (23 ऑक्टोबर) महत्त्वपूर्ण निर्णय दिला.  

दिवाळी साजरी करा, पण या वेळेतच फटाके फोडा 
दिवाळीदरम्यान फटाक्यांच्या धूर आणि आवाजामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली आहे. एवढंच नाही तर दिवाळीत फटाके फोडण्यासाठीची वेळदेखील ठरवून देण्यात आली आहे. संध्याकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत. केवळ दोन तासांमध्ये फटाके फोडण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाकडून मिळाली आहे.  

तर नाताळ आणि नवीन वर्षासाठी नागरिकांना रात्री 11.55 ते 12.30 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत. 





 

Web Title: Supreme Court allows bursting of crackers on diwali from 8 PM to 10 PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.