NOTA चा उमेदवार म्हणून विचार व्हावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका; निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 02:44 PM2024-04-26T14:44:05+5:302024-04-26T14:59:58+5:30

Lok Sabha Election 2024 : सुरत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.

supreme court to election commission on demanding recognition of nota as candidates and ban on unopposed elections, Lok Sabha Election 2024 | NOTA चा उमेदवार म्हणून विचार व्हावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका; निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर!

NOTA चा उमेदवार म्हणून विचार व्हावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका; निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर!

नवी दिल्ली : सध्या गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघाची चर्चा जोरदार सुरू आहे. याठिकाणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने खाते उघडले आहे. छाननीवेळी काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर अन्य उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने सुरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले. मात्र, आता या बिनविरोध निवडणुकीमुळे नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. 

सुरत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेत सूरतमध्येनिवडणूक बिनविरोध जिंकण्याची परिस्थिती टाळण्यासाठी 'नोटा'चा (NOTA) उमेदवार म्हणून विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात शिवखेडा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले आहे. NOTA ला उमेदवार मानले जावे आणि NOTA ला जर विजयी उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली तर त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेत सूरतचे उदाहरण दिले आहे.

याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जर एखाद्या उमेदवाराला NOTA पेक्षा कमी मते मिळाली तर त्याला पाच वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान, या याचिकेमुळे सूरत निवडणुकीतील भाजपा उमेदवाराचा विजय अडचणीत ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 

Web Title: supreme court to election commission on demanding recognition of nota as candidates and ban on unopposed elections, Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.