पाकिस्तानला धडा शिकवा, बीएसएफच्या महासंचालकांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 02:55 AM2018-01-19T02:55:01+5:302018-01-19T02:55:23+5:30
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत.
जम्मू : भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत.
भारत-पाकिस्तान सीमेवरील स्थिती तणावपूर्ण आहे. नियंत्रण रेषेलगत गोळीबार केल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या नागरी वस्त्या आणि भारतीय लष्कराच्या सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात शहीद झालेले जवान ए. सुरेश यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महासंचालक शर्मा म्हणाले की, बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तानी रेंजर्सनी झाडलेली एक गोळी सीमेवरील खंदकातील निमुळत्या खिंडारातून पार होत या जवानाला लागली. पाकिस्तानच्या बाजूनेच वारंवार भारतीय हद्दीत विनाकारण गोळीबार आणि उखळी तोफांचा भडिमार केला जातो. तथापि, आम्ही दरवेळी पलटवार करून या अगोचरपणाचा बदला घेत असतो, असे शर्मा म्हणाले.
ही युद्धजन्य स्थिती धोकादायकच आहे. जीवितहानी टाळण्यासाठी अभेद्य शिरस्त्राण आणि जाकीट असले तरी शरीराचे इतर भाग असुरक्षितच असतात. पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय हद्दीत विनाकारणगोळीबार करण्याची ही काही पहिली घटना नाही. ३ जानेवारी रोजी पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. त्यावेळी आम्ही ताकदीने पलटवार करून बदला घेतला होता.
पाकिस्तानी रेंजर्सचा गोळीबार :
मुलगी ठार
जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू आणि सांबा जिल्ह्यांलगत आंतरराष्टÑीय सीमेवरील भागातील चौक्या आणि गावांवर गोळीबारासोबत केलेल्या तोफमाºयात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला. तसेच एक मुलगीही ठार झाली. पाकिस्तानी रेंजर्सनी आर.एस. पुरा, अर्निया आणि रामगढ विभागातील आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या नागरी वस्त्या आणि लष्कराच्या चौक्यांवर निशाणा साधत बुधवारी रात्री ९ वाजेपासून गोळीबारासोबत तोफगोळ्यांचा भडिमार सुरू केला.पाकिस्तानी रेंजर्सच्या या कुरापतींना बीएसएफच्या जवानांनी चोख उत्तर देत पलटवार केला. पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्टÑीय सीमेलगतच्या २० नागरी वस्त्यांना हल्ल्याचे लक्ष्य केले. शेवटचे वृत्त येईपर्यंत गुरुवारी ६.४५ वाजेपर्यंत पाकिस्ताच्या बाजूने अधूनमधून गोळीबार आणि तोफमारा सुरूच होता.यात बीएसएफचा अन्य एक जवान जखमी झाला असून, या जवानाला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. शहीद झालेला जवान ए. सुरेश तामिळनाडूचा होता. ठार झालेल्या मुलीचे नाव नीलम देवी आहे. पाकिस्तानच्या बाजूने शस्त्रबंदीचे उल्लंघन केले जात असल्याने प्रशासनाने अधिकाºयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.