विद्यार्थ्यांदेखत शिक्षिकेला जाळलं जिवंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 10:58 AM2017-08-17T10:58:37+5:302017-08-17T10:58:41+5:30

बंगळुरूमध्ये एका शिक्षिकेला विद्यार्थ्यांदेखत जिवंत जाळण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

The teacher burnt the teacher in front of the students | विद्यार्थ्यांदेखत शिक्षिकेला जाळलं जिवंत 

विद्यार्थ्यांदेखत शिक्षिकेला जाळलं जिवंत 

Next

बंगळुरू, दि. 17 - एका शिक्षिकेला विद्यार्थ्यांदेखत जिवंत जाळण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. बंगळुरूहून जवळपास 55 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या मगादी येथे बुधवारी दुपारी एका सरकारी शाळेतील 50 वर्षीय शिक्षिकेला भरवर्गात जिवंत जाळण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या शिक्षिकेला जाळणारा व्यक्ती हा तिचा व्यावसायिक भागिदार असल्याचे बोलले जात आहे. त्यानं भरवर्गात शिक्षिकेवर रॉकेल ओतून तिला जाळलं.

केजी सुनंदा असे पीडित शिक्षिकेचं नाव असून या हल्ल्यात ती 50 टक्के भाजली आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे तिच्या शरीरावर गंभीर स्वरुपातील जखमा झाल्या आहेत. तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी रेणुकाराध्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. इयत्ता पाचवीच्या वर्गात सुनंदा शिकवत असताना ही घटना घडली. 

वाचा आणखी बातम्या
('त्या' 10 दिवसाच्या बाळाला स्वतः आईनेच फेकलं नदीत)
(पालक पनीरमध्ये आढळली मेलेली पाल, 5 जणांच्या प्रकृतीत बिघाड)
(गरोदर महिलेला हॉस्पिटलमधून बाहेर काढलं; ई-रिक्शात दिला बाळाला जन्म)

एका विद्यार्थ्यानं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती वर्गात आला आणि शिक्षिकेवर ओरडू लागला. यावेळी दोघांमध्ये काही वेळ वाद झाला व शिक्षिकेनं त्याला वर्गाबाहेर जाण्यास सांगितले. यावेळी रागाच्या भरात त्यानं सोबत आणलेल्या बाटलीचं झाकण उघडलं आणि शिक्षिकेच्या अंगावर त्यातील रॉकेल ओतले. यानंतर काडेपेटी पेटवून शिक्षिकेला त्यानं जिवंत जाळलं. या प्रकारानंतर वर्गातील आम्ही सर्व विद्यार्थी घाबरलो व ओरडू लागलो.  शिक्षिकेला जिवंत जाळल्यानंतर आरोपीनं तिथून फरार झाला, तर घाबरलेले विद्यार्थ्यांनी शिक्षिकेच्या मदतीसाठी अन्य शिक्षकांकडे धाव घेतली.  या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
 

Web Title: The teacher burnt the teacher in front of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.