Jammu Kashmir : ऑपरेशन ऑलआऊट! 72 तासांत 16 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 01:55 PM2018-11-25T13:55:48+5:302018-11-25T13:58:45+5:30

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतीय जवानही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

terror terrified from soldiers in jammu kashmir more than 16 terrorists killed by security forces in last 72 hour | Jammu Kashmir : ऑपरेशन ऑलआऊट! 72 तासांत 16 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir : ऑपरेशन ऑलआऊट! 72 तासांत 16 दहशतवाद्यांचा खात्मा

Next
ठळक मुद्देसीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतीय जवानही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. ल्या 72 तासांमध्ये राज्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी 16 दहशतवाद्यांच्या खात्मा केला आहे. 

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतीय जवानही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गेल्या 72 तासांमध्ये राज्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी 16 दहशतवाद्यांच्या खात्मा केला आहे. 

शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) झालेल्या चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.  या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  


शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात जवान व दहशतवाद्यामध्ये झालेल्या चकमकीत दहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अनंतनागमध्ये खात्मा करण्यात आलेले सर्व दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा व हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांमध्ये कार्यरत असल्याचा संशय आहे. तर यातील एक दहशतवादी अजाद मलिक हा ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणात सहभागी होता. 

Web Title: terror terrified from soldiers in jammu kashmir more than 16 terrorists killed by security forces in last 72 hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.