राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे थाटात वितरण, "कासव" सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
By admin | Published: May 3, 2017 07:36 PM2017-05-03T19:36:59+5:302017-05-03T20:32:06+5:30
64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात करण्यात आले होते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 03 - 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात करण्यात आले होते. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री एम. वेंकय्या नायडु आणि केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोडही उपस्थित होते. याचबरोबर या पुरस्कार वितरण सोहळ्याला अभिनेत्री सोनम कपूर, अक्षय कुमार, अदिल हुसेन यांच्यासह अनेक कलाकार आणि दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती.
उत्तर प्रदेशला फिल्म फ्रेंडली राज्याचा पुरस्कार देण्यासाठी ज्युरी अध्यक्ष म्हणून दिग्दर्शक मधुर भांडारकरही आले होते. पुरस्कार सोहळ्याची सुरूवात नॉन फीचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट लेखन या विभागापासून झाली.
यंदाच्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली आहे. कासव या मराठी चित्रपटला सुवर्णकमळाचा मान मिळाला आहे. दशक्रिया चित्रपटला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तसेच व्हेंटिलेटरचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. व्हेंटिलेटरला चार पुरस्कार मिळाले.
रुस्तम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अक्षय कुमारला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर मल्याळम अभिनेत्री सुरभी लक्ष्मीने मिनामीनुनगु चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. पिंक हा सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर, सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेल्या नीरजा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला. दंगलमधल्या झायरा वसीमला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अजय देवगणच्या शिवाय चित्रपटाला स्पेशल चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला.
या चित्रपटांना मिळाले राष्ट्रीय पुरस्कार....
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - कासव (सुवर्णकमळ)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - दशक्रिया
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी ( दशक्रिया)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम ( दंगल )
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - नीरजा
- सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट - पिंक
- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस - शिवाय
- सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग - व्हेंटिलेटर
- साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर
- सर्वोत्कृष्ट संकलन – व्हेंटिलेटर
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल
- फिल्म फ्रेंडली राज्य - उत्तरप्रदेश
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सुरवी (मिनामिन्नुन्गू)
- बेस्ट कॉस्च्युम डिझायनर - सायकल
- फिचर फिल्म स्पेशल मेन्शन
- सर्वोत्कृष्ट बालचित्रपट- धनक, नागेश कुकनूर
- सर्वोत्कृष्ट गायक - सुंदरा अय्यर, जोकर (तामिळ)
Actor Sonam Kapoor receives special mention award for her role in the film Neerja #NationalFilmAwardspic.twitter.com/tqG1CwYI7u
— ANI (@ANI_news) May 3, 2017
Akshay Kumar receives Best Actor award from President Mukherjee for his role in film Rustom; LK Advani congratulates him #NationalFilmAwardspic.twitter.com/an7zi8Z6M8
— ANI (@ANI_news) May 3, 2017