'ते पण माझे ठुमके पाहत असतील', भाजपा खासदाराच्या त्या विधानाचा सपना चौधरीनं घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 08:59 AM2018-06-26T08:59:12+5:302018-06-26T09:14:57+5:30

हरियाणातील सुप्रसिद्ध गायिका व डान्सर सपना चौधरीचा ठुमकेवाली असा उल्लेख करणारे भाजपा खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांचा सपनानं चांगलाच समाचार घेतला आहे.  

thumkewali comment dancer sapna chaudhry slams bjp mp by saying he may watch my dance | 'ते पण माझे ठुमके पाहत असतील', भाजपा खासदाराच्या त्या विधानाचा सपना चौधरीनं घेतला समाचार

'ते पण माझे ठुमके पाहत असतील', भाजपा खासदाराच्या त्या विधानाचा सपना चौधरीनं घेतला समाचार

नवी दिल्ली : हरियाणातील सुप्रसिद्ध गायिका व डान्सर सपना चौधरीचा ठुमकेवाली असा उल्लेख करणारे भाजपा खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांचा सपनानं चांगलाच समाचार घेतला आहे.  शाब्दिक वार करत सपनानं म्हटलं की, 'ते पण माझे ठुमके पाहत असतील, म्हणून त्यांनी असे विधान केले आहे. यासाठी त्यांचे धन्यवाद. एकप्रकारे भाजपा खासदारानं माझं कौतुकच केले आहे.' अशा शब्दांत सपना चौधरीनं अश्विनी कुमार चोप्रा यांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.  

सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अश्विनी कुमार चोप्रा यांनी टीका करत तिचा ठुमकेवाली असा उल्लेख केला होता. काही दिवसांपूर्वी सपना चौधरी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी आली होती. यानंतरच सपना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मला काँग्रेसचा प्रचार करण्याची इच्छा आहे, असे विधान सपना चौधरीने केले होते. याबाबत भाजपा खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सपना चौधरीचा उल्लेख ठुमकेवाली असा केला. ''काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे की ठुमके लावणाऱ्यांना नाचवायचे आहे?  काँग्रेसला ठुमक्यांमध्येच जास्त रस आहे'', अशी टीकादेखील चोप्रा यांनी केली होती. अश्विनी कुमार चोप्रा यांच्या याच वादग्रस्त विधानावर आक्षेप नोंदवत सपनानं त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. 
 


Web Title: thumkewali comment dancer sapna chaudhry slams bjp mp by saying he may watch my dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.