पाय घसरून पडल्याने तरुणास गंभीर दुखापत गोलाणीतील घटना : मार्केटच्या तळमजल्यावर साचलेल्या पाण्यामुळे घडला प्रकार

By Admin | Published: April 5, 2016 12:14 AM2016-04-05T00:14:28+5:302016-04-05T00:14:28+5:30

जळगाव : पाय घसरून पडल्याने भुसावळ येथील एका तरुणाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर घडली. या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वापराची जागा ओलसर झाल्याने हा प्रकार घडला. तरुणाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो घटनास्थळीच बेशुद्ध झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Trouble hurting youth due to severe injuries: The type of water caused by ground water on the ground floor | पाय घसरून पडल्याने तरुणास गंभीर दुखापत गोलाणीतील घटना : मार्केटच्या तळमजल्यावर साचलेल्या पाण्यामुळे घडला प्रकार

पाय घसरून पडल्याने तरुणास गंभीर दुखापत गोलाणीतील घटना : मार्केटच्या तळमजल्यावर साचलेल्या पाण्यामुळे घडला प्रकार

googlenewsNext
गाव : पाय घसरून पडल्याने भुसावळ येथील एका तरुणाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर घडली. या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वापराची जागा ओलसर झाल्याने हा प्रकार घडला. तरुणाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो घटनास्थळीच बेशुद्ध झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
देवेंद्र प्रभाकर चव्हाण (वय २२, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे त्या तरुणाचे नाव आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने देवेंद्र हा जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये असणार्‍या साई एंटरप्रायजेस या ठिकाणी गेल्या चार ते पाच वर्षांपासून कामाला आहे. तेथे पिं्रटिंगची कामे केली जातात. तो दररोज भुसावळ येथून रेल्वेने अप-डाऊन करतो. सोमवारी काही तरी कामानिमित्ताने तो गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर गेला होता. तेथे साचलेल्या पाण्याजवळून जात असताना ओलसर जागेवर त्याचा पाय घसरल्याने तो जमिनीवर पडला. त्यात डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याची शुद्ध हरपली. या प्रकारानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. देवेंद्रचे सहकारी प्रवीण पाटील, अनिल थोरात व ईश्वर पाटील यांनी त्याला तत्काळ रिक्षाने आकाशवाणी चौकातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात देवेंद्रवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकाराची माहिती देवेंद्रच्या सहकार्‍यांनी भ्रमणध्वनीद्वारे त्याच्या कुटुंबीयांना दिली. सायंकाळी त्याचे कुटुंबीय भुसावळातून जळगावात दाखल झाले होते.
महापालिकेच्या कारभारावर रोष
गोलाणी मार्केटच्या विविध विंगमध्ये तळमजल्यावर कचरा व सांडपाणी साचते. नियमित साफसफाई होत नसल्याने तेथे दुर्गंधी पसरते. त्याचा दुकानदारांसह खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तक्रारी करूनही महापालिकेकडून लक्ष दिले जात नाही. तळमजल्यावर नेहमी सांडपाणी साचलेले राहते. त्यामुळे अनेक जण पाय घसरून पडतात. सोमवारी घडलेली घटनादेखील त्याचाच एक भाग असल्याने नागरिकांकडून महापालिकेच्या भोंगळ कारभाराविषयी प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत होता.

कोट......
गोलाणीच्या तळमजल्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळेच आमचा सहकारी देवेंद्रला दुखापत झाली. पाणी साचलेले राहिले नसते; तर ही घटना घडली नसती. महापालिकेने याठिकाणी स्वच्छता केली पाहिजे.
-प्रवीण पाटील, देवेंद्रचा सहकारी

गोलाणीत नेहमी सांडपाणी साचलेले राहते. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. महापालिकेकडून स्वच्छता केली जात नाही. देवेंद्रला झालेल्या गंभीर दुखापतीस महापालिकाच जबाबदार आहे.
-ईश्वर पाटील, देवेंद्रचा मित्र

Web Title: Trouble hurting youth due to severe injuries: The type of water caused by ground water on the ground floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.