आधार कार्डधारकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अंमलात आणली टू लेअर सेफ्टी सिस्टिम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 06:42 PM2018-01-10T18:42:21+5:302018-01-10T21:53:21+5:30

आधार कार्डधारकांची दिलेली वैयक्तिक माहिती लीक होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आधार कार्डसाठी दिलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने बुधवारी नवी द्विस्तरीय सुरक्षा यंत्रणा अंमलात आणण्यात आली आहे.

Two-level security system implemented to safeguard the information of Aadhaar card holders | आधार कार्डधारकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अंमलात आणली टू लेअर सेफ्टी सिस्टिम

आधार कार्डधारकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अंमलात आणली टू लेअर सेफ्टी सिस्टिम

Next

नवी दिल्ली -  आधार कार्डधारकांची दिलेली वैयक्तिक माहिती लीक होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आधार कार्डसाठी दिलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने बुधवारी नवी द्विस्तरीय सुरक्षा यंत्रणा अंमलात आणण्यात आली आहे. व्हर्च्युअल आयडी बनवणे आणि लिमिटेड केवायसी जारी करणे अशी ही द्विस्तरीय सुरक्षा यंत्रणा आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन उपायांमुळे आधारकार्डधारकांची माहिती अधिक सुरक्षित राहणार आहे. 

 व्हर्च्युअल आयडीमुळे कुठल्याही आधार क्रमांकाच्या ऑथेंटिकेशनच्या वेळी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक शेअर करण्याची गरज संपुष्टात येईल. त्यामुळे आधार ऑथेंटिकेशन पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल. त्याबरोबरच व्हर्चुअल आयडी एक 16 अंकी संख्या असेल. जी ऑथेंटिकेशनसाठी आधार क्रमांकाच्या ठिकाणी वापरण्यात येईल. व्हर्च्युअल आयडी एक 16 अंकी क्रमांक असेल जो ऑथेंटिकेशनसाठी आधार क्रमांकाच्या जागी वापरात येईल. हा क्रमांक आवश्यक प्रसंगी संगणकामध्ये तात्काळ तयार होईल. तसेच सर्व एजंन्सी 1 जूनपर्यंत ही नवी प्रणाली वापरात आणणार आहे.  
तर लिमिटेड केवायसी सुविधा आधार कार्ड धारकांना नव्हे तर एजन्सींसाठी असेल. आतापर्यंत विविध एजन्सी केवायसीसाठी तुमचा आधार क्रमांक घेतल्यावर स्टोअर करतात. मात्र लिमिटेड केवायसीच्या सुविधेनंतर या एजन्सी तुमचा आधार क्रमांक स्टोअर करू शकणार नाहीत.

फक्त 500 रुपयांत कोणाच्याही आधार कार्डची माहिती मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. इंग्रजी वृत्तपत्र द ट्रिब्यूननं याबाबतचा दावा कतर वृत्त प्रसिद्ध केले होते.  द ट्रिब्यूनच्या एका पत्रकारानं 500 रुपयांमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून व्हाट्सअॅपवरुन एक असा सॉफ्टवेअर घेतला आहे. त्याद्वारे लाखो लोकांच्या आधार कार्डची माहिती त्यातून मिळू शकते.

या वृत्तामध्ये  रिपोर्टमध्ये आसा दावा करण्यात आला होका की, फक्त 500 रुपयात भारतातील सर्वच आधारकार्ड धारकांची माहिती मिळू शकते. द ट्रिब्यूनच्या त्या पत्रकारानं सॉफ्टवेअर तयार करणाऱ्याला एका एजंटद्वारे संपर्क केला. त्याला पेटीएमद्वारे पैसे पाठवले. त्यानंतर 10 मिनीटात लगेच एका व्यक्तीनं एक लॉगइन आईडी आणि पासवर्ड दिला. त्याद्वारे पोर्टलवर कोणत्याही आधारकार्डची माहिती मिळू शकते.  यामध्ये नाव, पत्ता, पिन कोड, फोन क्रमांक आणि मेल आयडीचा समावेश आहे.   

यामुळे आधार कार्डमधील माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. दरम्यान, या पत्रकारावर गुन्हा दाखल झाल्याने वाद निर्माण झाला होता.

Web Title: Two-level security system implemented to safeguard the information of Aadhaar card holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.