अमेरिकेतील वादळामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले; धर्मेंद्र प्रधान यांचं अजब विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 04:36 PM2017-09-23T16:36:27+5:302017-09-23T16:38:23+5:30
अमेरिकेत आलेल्या वादळामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत, असं अजब विधान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे.
नवी दिल्ली- अमेरिकेत आलेल्या वादळामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत, असं अजब विधान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या या वक्तव्यामुळे सगळीकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत वादळ आल्यानं भारतात पेट्रोलचे दर वाढले आहेत. प्रत्येक राज्याचा स्वतंत्र महसूल वसूली विभाग असतो. त्यामुळे बॅलेन्स मॉडल असावं, जीएसटी कॉन्सिल एक बॅलन्स मॉडल तयार करत आहे, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हंटलं आहे.
तुम्हाला जर विकास हवा असेल तर कर भरायला हवा, असंही त्यांनी म्हंटलं. देशभरात पेट्रोलवर समान कर असायला हवा, असं मत धर्मेंद्र प्रधान त्यांनी व्यक्त केलं. भाजपा शासित राज्यात कल्याणकारी योजनांवर सर्वाधिक खर्च केला जातो, असा दावा धर्मेंद्र प्रधान यांनी केला. पेट्रोल आणि डिझेललाही जीएसटीच्या अंतर्गत आणायला हवं, असंही त्यांनी केलं होतं. दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होतील, अशी शक्यता काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी केलं होतं.
दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता- धर्मेंद्र प्रधान
दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलले जातात. त्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या या वाढलेल्या दरांवर सर्व स्तरातून टीका होते आहे. सर्वसामान्यांबरोबरच विरोधकांकडूनही सरकारवर टीकेचा भडीमार केला जातो आहे. सरकारच्या या धोरणावर विरोधकांकडून टीका झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दिवाळीपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तविली. युएसमध्ये आलेल्या पुरामुळे तेलाच्या निर्मीतील 13 टक्क्यांनी घट झाली म्हणूनच रिफायनरी तेलाच्या किंमती वाढल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे. याचवेळी इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वर्तवली. इंधनाचे दर जीएसीटी कक्षेत येतील का? असा प्रश्न विचारला असता इंधन दर जीएसटीच्या कक्षेत यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. असे झाल्यास ग्राहकांना फायदा होईल असंही धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं.