ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या, हल्लेखोरांनी राहत्या घरीच केला भ्याड हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 10:24 PM2017-09-05T22:24:21+5:302017-09-05T22:54:34+5:30
बंगळुरू, दि. 5 - देशातील आघाडीच्या पत्रकारांपैकी एक असलेल्या गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रात्री आठ सव्वाआठच्या सुमारास तीन ते चार हल्लेखोरांनी गौरी यांच्या घरात घुसले आणि त्यांनी जवळून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांच्यावर हा हल्ला का करण्यात आला. तसेच त्यांच्यावर हल्ला करणारे कोण होते. याबाबत काहीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
55 वर्षीय गौरी लंकेश या साप्ताहिक लंकेश पत्रिकाच्या संपादक होत्या. तसेच त्या विविध वर्तमानपत्रांमध्ये लिखाण करायच्या. त्यांनी उजव्या विचारसरणीच्या प्रवृत्तीवर सातत्याने टीका केली होती. दरम्यान, आज रात्री बंगळुरूमधील राजराजेश्वरी परिसरातील त्यांच्या घरातच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर घरात घुसून हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या गौरी लंकेश यांचा जागी मृत्यू झाला. दरम्यान, या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
#Visual of senior journalist Gauri Lankesh shot dead at her residence in Bengaluru's Rajarajeshwari Nagar (Pic Source: Local media) pic.twitter.com/sV2S9DWyjg
— ANI (@ANI) September 5, 2017
#Visuals from residence of senior journalist Gauri Lankesh in Bengaluru's Rajarajeshwari Nagar, shot dead this evening. Police at the site pic.twitter.com/tLRUe85J63
— ANI (@ANI) September 5, 2017
There are two CCTV cameras; three teams are working on this: Karnataka Home Minister Ramalinga Reddy #GauriLankeshpic.twitter.com/y3rO0ryhvB
— ANI (@ANI) September 5, 2017