वेतनदारांना झटका, भविष्य निर्वाह निधी काढताना कर लागणार

By admin | Published: February 29, 2016 06:39 PM2016-02-29T18:39:03+5:302016-02-29T18:41:53+5:30

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर कक्षेत आणण्याचे प्रस्तावित केले आहे.

Wages will be required to blow up, while withdrawing the provident fund | वेतनदारांना झटका, भविष्य निर्वाह निधी काढताना कर लागणार

वेतनदारांना झटका, भविष्य निर्वाह निधी काढताना कर लागणार

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २९ - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर कक्षेत आणण्याचे प्रस्तावित केले आहे. येत्या १ एप्रिल २०१६ पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी काढताना ठराविक रक्कमेवर कर आकारणी करण्यात येईल. 
जवळपास सहा कोटी नागरीकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील ४० टक्के रक्कम करमुक्त असेल मात्र उर्वरित ६० टक्के रक्कमेवर कर आकारण्यात येईल असे अरुण जेटली यांनी सांगितले. 
सध्या भविष्य निर्वाह निधीतील रक्कमेवर कर लागत नाही. मात्र हा नियम लागू झाल्यानंतर कर्मचा-याला ६० टक्के रक्कमेवर कर भरावा लागणार आहे. कर्मचा-याच्या टॅक्स स्लॅबनुसार ही कर आकारणी केली जाईल. 
 

Web Title: Wages will be required to blow up, while withdrawing the provident fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.