१३०० शिक्षणसेवक प्रतीक्षेत

By admin | Published: December 31, 2014 12:06 AM2014-12-31T00:06:17+5:302014-12-31T18:54:28+5:30

श्रीरामपूर : राज्यातील १३०० शिक्षणसेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २ मे २०१० रोजी प्राथमिक शिक्षणसेवकांच्या १५ हजार पदांसाठी केंद्रीय भरतीपूर्व परीक्षा (सीईटी)घेतली होती. त्याचा निकाल १ जून २०१० ला लागला. उत्तरपत्रिकेत दहा प्रश्नांची उत्तरे चुकीची आढळल्याने काही उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सरकारने उत्तरपत्रिकेतील चुका काढून दोषरहीत उत्तरपत्रिका काढावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. सरकारने ४ जुलै २०११ च्या निर्णयानुसार संबंधित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी समिती स्थापन केली. समितीने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या १४ हजार ४०० पैकी ३१२१ उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरविले. त्यांना नियुक्त्या न दिल्याने पुन्हा न्यायालयात गेल्यानंतर तब्बल साडेचार वर्षानंतर १७५९ उमेदवारांना ३१ मे २०१४ रोजी नियुक्त्य्

Waiting for 1300 educators | १३०० शिक्षणसेवक प्रतीक्षेत

१३०० शिक्षणसेवक प्रतीक्षेत

Next

श्रीरामपूर : राज्यातील १३०० शिक्षणसेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २ मे २०१० रोजी प्राथमिक शिक्षणसेवकांच्या १५ हजार पदांसाठी केंद्रीय भरतीपूर्व परीक्षा (सीईटी)घेतली होती. त्याचा निकाल १ जून २०१० ला लागला. उत्तरपत्रिकेत दहा प्रश्नांची उत्तरे चुकीची आढळल्याने काही उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सरकारने उत्तरपत्रिकेतील चुका काढून दोषरहीत उत्तरपत्रिका काढावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. सरकारने ४ जुलै २०११ च्या निर्णयानुसार संबंधित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी समिती स्थापन केली. समितीने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या १४ हजार ४०० पैकी ३१२१ उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरविले. त्यांना नियुक्त्या न दिल्याने पुन्हा न्यायालयात गेल्यानंतर तब्बल साडेचार वर्षानंतर १७५९ उमेदवारांना ३१ मे २०१४ रोजी नियुक्त्या दिल्या. उर्वरित १३६२ उमेदवारांना दोन महिन्यांमध्ये नियुक्त्या देण्याचे आश्वासन शिक्षण संचालनालयातील अधिकार्‍यांनी दिले होते. पण शिक्षण संचालनालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका पात्र उमेदवारांना बसत असून १३६२ उमेदवार आजही नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्हा परिषदांकडून प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांचा अहवाल वेळेवर मिळत नसल्याचे कारण शिक्षण संचालनालयातील अधिकारी सांगत आहेत. त्यांच्याकडून तात्काळ माहिती मागवून १३६२ शिक्षणसेवकांना रिक्ताजागी पदस्थापना द्यावी, अशी मागणी डी.एड. सी.ई.टी.पुनर्मूल्यांकन पात्र उमेदवारांनी शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting for 1300 educators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.