दिल्ली विमानतळावर टाळ्यांच्या कडकडाटात जवानांचं स्वागत
By admin | Published: April 19, 2017 02:53 PM2017-04-19T14:53:37+5:302017-04-20T12:13:56+5:30
दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या भारतीय जवानांचं टाळ्यांचा कडकडाट करत कौतुक करत सन्मानित करण्यात आलं
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - सीमारेषेवर जीवाची पर्वा न करता देशवासियांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र डोळ्यात तेल घालून जागता पहारा देणा-या जवानांचं करावं तितकं कौतुक कमीच. पण किती वेळा आपण त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करतो. एखादा सैनिक किंवा सीमेवर लढणारा तो जवान समोर आला तर आपली काय प्रतिक्रिया असते ? एखाद्या सामान्य व्यक्तीकडे आपण पाहतो तसंच त्यांनाही पाहतो का ? असे अनेक प्रश्न आहेत. पण दिल्ली विमानतळावर घडलेल्या घटनेमुळे तुम्हालाही कदाचित जवानांप्रती आपला आदर व्यक्त करण्याची प्रेरणा मिळेल.
दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या भारतीय जवानांचा टाळ्यांचा कडकडाट करत कौतुक करण्यात आलं. त्यांचं सामान्यांकडून असं जाहीर कौतुक होण्याची ही कदाचित देशातील पहिलीच घटना असावी. हे जवान विमानतळावर पोहोचले असता लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले. अशाप्रकारे मिळणारा आदर आणि कौतुक पाहून जवानही भारावून गेले होते. मेजर गौरव आर्या यांनी विमानतळावरील व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. प्रत्येक देशवासियासाठी हा एक अभिमानाचा क्षण असेल.
इंडियन एक्स्प्रेसने मेजर गौरव आर्या यांच्याशी बातचीत केली. "भारतीय जवान यूएन मिशनवरुन परतले होते. दुपारी तीन वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानळावर त्यांचं आगमन झालं. यावेळी उपस्थित प्रवासी आणि कर्मचा-यांना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. भारतात हे असं होताना मी कधीच पाहिलेलं नाही. हे खूपच विलक्षण आहे. मला सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
.
0300 hrs, Indira Gandhi International Airport, crowds break into spontaneous applause when they see #IndianArmy soldiers. The day has come