आस्थेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही- मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 05:46 AM2017-08-16T05:46:08+5:302017-08-16T05:46:16+5:30
देशाला लोकसहभागाची मोठी परंपरा लाभली आहे.
नवी दिल्ली : देशाला लोकसहभागाची मोठी परंपरा लाभली आहे. लोकसहभागातूनच विकास साधता येतो. त्यामुळे न्यू इंडियासाठी ‘टीम इंडिया’ने एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहणानंतरच्या भाषणात केले. आस्थेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी कट्टरतावाद्यांना दिला.
संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचा उत्सवही साजरा करत आहे. सुदर्शन चक्रधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे, असे म्हणत देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वा कोटी देशवासीयांतर्फे पंतप्रधान मोदी यांनी नमन केले.
१९४२ ते १९४७ या काळात स्वातंत्र्यासाठी भारताने एकीचे बळ दाखवले. त्याचप्रकारे आता नवीन भारत साकारण्यासाठी पुढील पाच वर्षे म्हणजेच २०२२ पर्यंत सर्वांनी एकत्र यायचे आहे. एकी हीच आपली खरी ताकद आहे. देशात कुणीही मोठे किंवा लहान नसून सर्व समान आहेत. याच समानतेतून, सकारात्मक विचारातून देशाला विकासाच्या दिशेने पुढे न्यायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
>चार वर्षांतंील छोटे भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केलेले भाषण चार वर्षांतील सर्वात छोटे म्हणजे ५४ मिनिटांचे होते. पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात'मध्ये बोलताना स्वातंत्र्य दिनाची भाषणे खूप मोठी असल्याची तक्रार करणारी पत्रे मिळाल्याचे सांगितले होते. या वेळी स्वातंत्र्यदिनी होणारे भाषण छोटे असेल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.
‘गाली से ना गोली से, परिवर्तन
होगा कश्मिरी को गले लगाने से’
या वेळी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरही मोदींनी आपली भूमिका मांडली. ‘न गाली से, न गोली से... परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से’, असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
>ध्वजवंदनानंतर विद्यार्थिनीवर बलात्कार
चंदिगढ : स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यावरून परतत असताना
एका आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना चंदिगढमध्ये घडली आहे. - वृत्त/७