लेखिका कृष्णा सोबती यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 05:30 AM2019-01-26T05:30:01+5:302019-01-26T05:30:08+5:30
हिंदी साहित्याच्या नामवंत लेखिका कृष्णा सोबती (९४) यांचे येथे निधन झाले.
नवी दिल्ली : हिंदी साहित्याच्या नामवंत लेखिका कृष्णा सोबती (९४) यांचे येथे निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी श्याम निगमबोध घाटावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानात झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत आले.
कृष्णा सोबती यांनी १९५० मध्ये ‘लामा’ कादंबरीने साहित्ययात्रा सुरू केली. त्या स्त्री मुक्ती आणि न्यायाचा पुरस्कार करीत असत. तो त्यांच्या लेखनातूनही दिसत असे. ‘जिंदगीनामा’साठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९९६ मध्ये साहित्य अकादमीची ‘फेलोशिप’ देण्यात आली. कृष्णा सोबती यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार २०१७ मध्ये देण्यात आला होता.‘जिंदगीनामा’साठी त्यांना १९८० मध्येही साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांना पद्मभूषण, व्यास सन्मान, शलाका सन्मान देण्यात आले होते. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये सूरजमुखी ‘अंधेरे के’, ‘दिलोदानिश’, ‘जिंदगीनामा’ यांचा समावेश आहे.