विभागीय स्पर्धेसाठी जिल्हा परिषद कामाचे मूल्यांकन यशवंत पंचायत राज अभियान

By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:35+5:302014-12-20T22:27:35+5:30

अकोला: यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागीय स्पर्धेसाठी विभागीय मूल्यांकन पथकाकडून शनिवारी अकोला जिल्हा परिषदेच्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनाचा अहवाल पथकामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.

Yashwant Panchayat Raj campaign for evaluation of district council work for departmental competition | विभागीय स्पर्धेसाठी जिल्हा परिषद कामाचे मूल्यांकन यशवंत पंचायत राज अभियान

विभागीय स्पर्धेसाठी जिल्हा परिषद कामाचे मूल्यांकन यशवंत पंचायत राज अभियान

Next
ोला: यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागीय स्पर्धेसाठी विभागीय मूल्यांकन पथकाकडून शनिवारी अकोला जिल्हा परिषदेच्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनाचा अहवाल पथकामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागीय स्पर्धेसाठी जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात आलेल्या विविध योजना, करण्यात आलेली विकासकामे आणि योजनांमधून लाभार्थ्यांना देण्यात आलेला लाभ व इतर प्रकारच्या कामांचे मूल्यांकन केले जाते. या अभियानांतर्गत सन २०१३-१४ या वर्षीच्या विभागीय स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय पथकाकडून शनिवारी अकोला जिल्हा परिषद अंतर्गत कामाचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनाचा अहवाल पथकामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.
बॉक्स......................................................
धाबा व खांबोरा ग्रामपंचायतच्या कामाचेही मूल्यांकन!
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत यावर्षी विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या धाबा आणि अकोला तालुक्यातील खांबोरा या दोन ग्रामपंचायतींच्या कामाचे मूल्यांकन विभागीय मूल्यांकन पथकाकडून शनिवारी सायंकाळी करण्यात आले. अमरावती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाडे यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय मूल्यांकन पथकाने धाबा व खांबोरा या दोन्ही ग्रामपंचायतींना भेट देऊन, ग्रामपंचायतींच्या कामांचे मूल्यांकन केले. या मूल्यांकनाचा अहवाल पथकाकडून लवकरच विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.

Web Title: Yashwant Panchayat Raj campaign for evaluation of district council work for departmental competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.