भुजबळांच्या संस्थेला दिलेला भूखंड रद्द, सिडकोचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:23 AM2018-01-30T05:23:48+5:302018-01-30T05:24:01+5:30

महाराष्ट्र सदन बांधकामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट संस्थेला सानपाडा येथे केलेले भूखंड वाटप सिडकोने रद्द केले आहे. निर्धारित वेळेत बांधकाम न केल्याने नियमाचा आधार घेत, ही कारवाई करण्यात आल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सांगितले.

 Cancellation of land given to Bhujbal Society, CIDCO decision | भुजबळांच्या संस्थेला दिलेला भूखंड रद्द, सिडकोचा निर्णय

भुजबळांच्या संस्थेला दिलेला भूखंड रद्द, सिडकोचा निर्णय

Next

- कमलाकर कांबळे
नवी मुंबई  - महाराष्ट्र सदन बांधकामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट संस्थेला सानपाडा येथे केलेले भूखंड वाटप सिडकोने रद्द केले आहे. निर्धारित वेळेत बांधकाम न केल्याने नियमाचा आधार घेत, ही कारवाई करण्यात आल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सांगितले.
सिडकोने भुजबळ यांच्या शिक्षण संस्थेला शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय उभारण्यासाठी सानपाडा सेक्टर १५ येथे ३,४९१ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ६५ लाख ४६ हजार ६२३ रुपये या नाममात्र किमतीत दिला होता. या भूखंडाचा करार १८ आॅक्टोबर २00३ रोजी करण्यात आला होता. करारातील अटी व शर्तीनुसार निर्धारित वेळेत बांधकाम परवानगी घेऊन प्रत्यक्ष काम सुरू करणे गरजेचे होते, परंतु संस्थेकडून आजतागायत बांधकाम परवानगीच घेतली नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, या संस्थेला बांधकाम परवानगी घेण्यासाठी मुदतवाढही दिली होती. मात्र, त्यानंतरही संस्थेकडून कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सिडकोकडून या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, परंतु या नोटिसीला संस्थेकडून समानधानकारक उत्तर न मिळाल्याने सिडकोने हे भूखंड वाटप रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गेल्या आठवड्यात त्यावर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली आहे. करारमुक्त झालेला हा भूखंड सिडकोने आता विक्रीसाठी काढला आहे. त्यासंबंधीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, सवलतीच्या दरात भूखंड घेऊन वर्षानुवर्षे त्यावर बांधकाम न करणाºया अन्य सामाजिक व शैक्षणिक संस्थांवरही येत्या काळात धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे गगराणी यांनी सांगितले.
 

Web Title:  Cancellation of land given to Bhujbal Society, CIDCO decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.