धोंडाळपाडा गावात सापडले डेंग्यूचे रुग्ण

By admin | Published: August 6, 2015 11:39 PM2015-08-06T23:39:39+5:302015-08-06T23:39:39+5:30

किन्हवली परिसरातील टाकीपठार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील धोंडाळपाडा येथे डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोन रुग्ण बरे झाले असून

Dengue sufferers found in Dhondalpada village | धोंडाळपाडा गावात सापडले डेंग्यूचे रुग्ण

धोंडाळपाडा गावात सापडले डेंग्यूचे रुग्ण

Next

किन्हवली : किन्हवली परिसरातील टाकीपठार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील धोंडाळपाडा येथे डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोन रुग्ण बरे झाले असून तिघांवर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गावातील उत्तम बारकू खंडागळे (३२) या डेंग्यू रुग्णावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून शशिकांत कृष्णा खंडागळे (२२) याच्यावर शहापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच चिंतामण कमळू खंडागळे (५५) व गणेश चिंतामण खंडागळे (२०) यांनी पुणे जिल्ह्णातील जुन्नर येथील डॉ. एस.एस. शेवाळे यांच्या तुळजाभवानी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सोडून देण्यात आले आहे. नांदगाव येथील शोभा नामदेव धानके (३७) या महिलेवरसुद्धा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत टाकीपठार प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, डेंग्यूबरोबरच या परिसरात टायफॉइड व मलेरियाची साथही पसरली असून याच आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक दुंदाजी दवणेसुद्धा टायफॉइडने आजारी आहेत.

Web Title: Dengue sufferers found in Dhondalpada village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.