प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या

By admin | Published: May 11, 2017 02:14 AM2017-05-11T02:14:40+5:302017-05-11T02:14:40+5:30

महानगरपालिका निवडणुकीत गाजावाजा करण्यापेक्षा प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर अधिक होत आहे. लाऊडस्पीकर

Different Characters for Promotion | प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या

प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : महानगरपालिका निवडणुकीत गाजावाजा करण्यापेक्षा प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर अधिक होत आहे. लाऊडस्पीकर लावून फिरण्याचा एका वाहनासाठीचा खर्च दोन ते अडीच हजारांपर्यंत जातो. त्यामुळे आता अशा वाहनांचा वापर उमेदवार करताना दिसत नाहीत. मोबाइलचा बीप वाजला, की समजायचे कोणत्या तरी उमेदवाराच्या प्रचाराचा एसएमएस आहे, अशी सध्याची परिस्थिती पनवेलमध्ये आहे. उमेदवारांसह मतदारही हायटेक झाल्याने प्रचाराचा ढंगही बदलला आहे. याचा विचार करता उमेदवार प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात.
पूर्वी लाऊडस्पीकर वेगवेगळी वाहने दिसले, की निवडणुकीचा प्रचार सुरू झाला हे ठरलेले. मात्र,आता हे आवाजच बंद झाले. पूर्वी तोफखानी आवाजात प्रचार ऐकल्याशिवाय निवडणूक जाणवतच नव्हती. माईकवर उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, मतदान कधी आहे, त्याबाबत माहिती द्यायची, यामुळे वेगळ्या ढंगात उमेदवाराची माहिती मिळायची. मात्र सध्या काही उमेदवारांकडून आता वैयक्तिक व इतर माहितीसह एक सीडी तयार केली जाते, यामध्ये अनेक गोष्टींचा माहिती दिली जाते. ही माहिती देण्यासाठी फिरणाऱ्या वाहनांत चालकाशिवाय इतरांची आवश्यकता नसते. पनवेल महानगरपालिका निवडणूक हायटेक प्रचारयंत्रणा सोशल मीडियासह इतर माध्यमांतूनही प्रचार केला जात आहे.

Web Title: Different Characters for Promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.