रिलायन्सच्या इमारतीला आग, लाखोंचे साहित्य जळाले, अडीच तासांमध्ये आग नियंत्रणामध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 05:03 AM2017-10-31T05:03:19+5:302017-10-31T05:03:29+5:30
ठाणे-बेलापूर रोडवरील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीमध्ये सुरू असलेल्या रिलायन्स रुग्णालयाच्या तिस-या मजल्यावर सोमवारी दुपारी आग लागली. इमारतीमध्ये बसविण्यासाठी आणलेले वातानुकूलित यंत्र, रंग व इतर साहित्याने अचानक पेट घेतल्याने ही दुर्घटना झाली असून त्यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर रोडवरील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीमध्ये सुरू असलेल्या रिलायन्स रुग्णालयाच्या तिसºया मजल्यावर सोमवारी दुपारी आग लागली. इमारतीमध्ये बसविण्यासाठी आणलेले वातानुकूलित यंत्र, रंग व इतर साहित्याने अचानक पेट घेतल्याने ही दुर्घटना झाली असून त्यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
कोपरखैरणे रेल्वे स्टेशनसमोर धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीच्या प्रवेशद्वाराजवळच रिलायन्स समूहाच्यावतीने रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. सहा मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून आतमधील पीयूपी, फर्निचर व अंतर्गत सजावटीचे काम वेगाने सुरू आहे. रोज शेकडो कर्मचारी रुग्णालयाचे काम पूर्ण करण्यामध्ये व्यस्त आहेत. तिसºया मजल्यावर साहित्य ठेवण्यासाठी गोडावून करण्यात आले असून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक तेथे आग लागली. शॉर्टसर्किटमुळे किंवा वेल्डिंगच्या कामामुळे आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. डीएकेसीमधील यंत्रणेच्या साहाय्याने आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. पावणे अग्निशमन केंद्र दोन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे तेथूनही दोन वाहने तत्काळ घटनास्थळी आली. याशिवाय वाशी अग्निशमन दलाचाही एक टँकर बोलावण्यात आला. सहा वाहनांच्या साहाय्याने अडीच तासांमध्ये आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
अचानक लागलेल्या आगीमुळे इमारतीमध्ये काम करणाºया कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु येथील सुपरवायझर व सुरक्षा रक्षकांनी सर्व कर्मचाºयांना तत्काळ खाली नेले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ठाणे-बेलापूर रोडनजीकच रेल्वे स्टेशनच्या समोर ही घटना घडली असल्यामुळे पाच ते सहा हजार नागरिकांचा जमाव या परिसरामध्ये जमा झाला होता. अखेर पोलिसांनी नागरिकांना तेथून हुसकावून लावल्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना आग विझविताना होणारे अडथळे दूर केले.
पोलिसांनी हटविली गर्दी
आग लागल्याचे वृत्त समजताच कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. बी. देशमुख तत्काळ घटनास्थळी हजर झाले. सर्व्हिस रोडवर व पादचारी पुलावर पाच ते सहा हजार नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी मोटारसायकल सर्व्हिस रोडवर उभ्या केल्या होत्या.
यामुळे अग्निशमन दलाची वाहने ये - जा करण्यासाठी अडथळा निर्माण होवू लागला होता. देशमुख यांनी स्वत: हातामध्ये काठी घेवून विनाकारण गर्दी करणाºयांना तेथून हुसकावून लावले. मोटारसायकल बाजूला करून रोड मोकळा केला व दोन्ही बाजूला दोरीच्या साहाय्याने तात्पुरता अडथळा निर्माण करून अग्निशमन अधिकारी व कर्मचाºयांच्या कामातील अडथळा दूर केल्याने उपस्थितांनीही त्यांचे कौतुक केले.