प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:43 AM2017-09-15T06:43:37+5:302017-09-15T06:43:49+5:30

वावंजे गावाच्या रस्त्यातील विहिरीत तालुका पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या व्यक्तीची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते. प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पत्नीला अटक केली असून, प्रियकर फरार झाला आहे.

 Husband murdered by wife with the help of a boyfriend | प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या  

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या  

googlenewsNext

पनवेल : वावंजे गावाच्या रस्त्यातील विहिरीत तालुका पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या व्यक्तीची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते. प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पत्नीला अटक केली असून, प्रियकर फरार झाला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील उसाटने गावातील उमेश ज्ञानदेव मढवी हा ९ सप्टेंबरपासून घरातून गायब झाल्याची तक्र ार त्याची पत्नी तृप्ती मढवी हिने हिललाइन पोलीस ठाणे, कल्याण येथे दिली होती. याच दरम्यान तालुका पोलिसांना १२ सप्टेंबर रोजी वावंजे गावाजवळ विहिरीत एका तरु णाचा मृतदेह सापडला. तो मृतदेह उमेशचा असल्याची ओळख पटल्यावर त्याच्या पत्नीस चौकशीसाठी बोलावले. तपासादरम्यान तृप्तीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चौकशी केली असता, प्रियकराच्या मदतीने उमेशची हत्या केल्याची कबुली तिने दिली. उमेश व तृप्तीचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगीही आहे. उमेश तळोजा एमआयडीसीमध्ये एका कंपनीत कामाला होता. तृप्तीचे शेजारच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ८ सप्टेंबर रोजी तृप्तीला प्रियकराला भेटायचे असल्याने तिने उमेशला झोपेच्या गोळ्या दिल्या. मात्र, यावेळी बाचाबाची झाल्याने तृप्ती व तिच्या प्रियकराने लोखंडी रॉडने उमेशला मारहाण केली. त्यानंतर गळा आवळून त्याला ठार मारले. त्यांनतर त्याचे प्रेत वावंजेतील विहिरीत टाकले.

Web Title:  Husband murdered by wife with the help of a boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.