अलिबागमध्ये नववर्ष स्वागत यात्रा

By Admin | Published: April 9, 2016 02:23 AM2016-04-09T02:23:17+5:302016-04-09T02:23:17+5:30

गुढीपाडव्या निमीत्त अलिबाग शहरात आयोजित मराठी नववर्ष स्वागत यात्रेत तरुणाई आणि महिलांचा प्रचंड उत्साह पाहाण्यास मिळाला

New Year Welcome Tour in Alibaug | अलिबागमध्ये नववर्ष स्वागत यात्रा

अलिबागमध्ये नववर्ष स्वागत यात्रा

googlenewsNext

अलिबाग : गुढीपाडव्या निमीत्त अलिबाग शहरात आयोजित मराठी नववर्ष स्वागत यात्रेत तरुणाई आणि महिलांचा प्रचंड उत्साह पाहाण्यास मिळाला. मराठमोळ््या पेहेरावातील अबाल-वृद्ध आणि त्याचबरोबर महिलांचे ढोल पथक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. सकाळी शहरातील ब्राम्हण आळीमधील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात अलिबाग मधील व्ज्येष्ठ वकिल अ‍ॅड.एन.के.जोशी आणि ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ पाटील यांनी सपत्नीक गुढीची विधवत पूजा केल्यावर या नववर्ष स्वागत यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे घोड्यावरुन या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
शहरातील विविध गणेश मंडळे, नवरात्र मंडळे, विविध संस्था, ज्ञाती मंडळे आणि विविध युवा मंडळे या सह सर्वपक्षीय राजकीय व्यक्तीमत्वे या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. राममंदिर, महाविरचौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूतळा, चेंढरे मारुती मंदिर, शेतकरी भवन, ठिकरुळ नाका, शिवलकर नाका, बाजारपेठ मार्गे ही नववर्ष स्वागत यात्रा सरखेल कान्होजी आंग्रे स्मारक येथे आल्यावर सांगता झाली. यंदाचे वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष असल्याने, त्याचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनावर आधारीत चित्ररथ हे यंदाचे एक वैशिष्ट्य होते. प्रतिवर्षी या स्वात यात्रेत नागरिकांचा सहभाग वाढत असल्याचे नववर्ष स्वागत यांत्रेचे निमंत्रक डॉ. प्रा. उदय जोशी यांनी सांगितले. खगोलशास्त्र, कर्तृत्ववान महिला या विषयावरील आगळे चित्र तर ऐतिहासिक पेहेरावातील घोडेस्वार, घोडागाड्या, मल्लखाब पथके, आणि तालुक्यांतील विविध बॅन्ड पथके यांचा सहभाग हे या नववर्ष यात्रेचे एक वैशिष्ट्य होते. (विशेष प्रतिनिधी)
> महाडमध्ये शोभायात्रा
महाड : नवीन मराठी वर्षाच्या स्वागतानिमित्त महाडमध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. या शोभायात्रेमध्ये ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत पुरुषांसह महिलाही मोठ्या उत्साहाने सहभाग झाल्या होत्या. शहरातील विविध ढोल पथके सामील झाली होती.
रोहा अष्टमी नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवा निमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सी. डी देशमुख शहर सभागृह येथून प्रारंभ झालली ही शोभा यात्रा शहरात सर्वत्र फिरली. नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठया संख्येने रोहेकर यात्रेत सहभागी झाले होते. शोभा यात्रेचे नियोजन सुखद राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. सायंकळी प्रफुल्लित वातावरणात ठिकठिकाणी काढलेल्या आकर्षक रांगोळ््या, नेत्रदीपक वेशभूषा, विविध चित्ररथ हे या यात्रेचे आकर्षण ठरले.नेरळ : तरु णाईचा जल्लोष, ढोलताशांच्या गजरात संपूर्ण नेरळ आणि परिसरात उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. पारंपरिकतेचे सत्व जपत नेरळमध्ये नववर्ष शोभायात्रेचे आयोजन केले होते. नेरळमधील नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेस चिंचआळी येथील दत्त मंदिर येथून प्रारंभ झाला.

Web Title: New Year Welcome Tour in Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.