अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आणखी काही आरोपींचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 03:39 AM2018-03-10T03:39:03+5:302018-03-10T03:39:03+5:30
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे ग्रामीणचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह चार जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
कळंबोली - सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे ग्रामीणचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह चार जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा हात असल्याची माहिती पोलिसांनी शुक्र वारी पनवेल न्यायालयात दिली. याच मुद्द्यावर महेश पळणीकर या चौथ्या आरोपीला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कुरुंदकर याचा बालमित्र महेश पळणीकर याने हत्येच्या गुढाची उकल केली. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. त्यामुळेच बिद्रे हत्येप्रकरणी पुढील तपासासाठी पळणीकर पोलीस कोठडीत असणे महत्त्वाचे असल्यचा सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करून त्याच्या कोठडीत वाढ केली.
डायरीचा शोध
मुख्य आरोपी अभय कुरुंदकर रोज खासगी डायरी लिहीत असे. त्याच्या डायरीत अश्विनी यांच्या खुनाविषयी गोपनीय माहिती मिळण्याची शक्यता आहे. तशी बाब पळणीकर यांच्या चौकशीत पुढे आली आहे.