पहाटेपर्यंत बारमध्ये रंगताहेत पार्ट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:53 AM2018-03-17T02:53:03+5:302018-03-17T02:53:03+5:30

पहाटेपर्यंत चालणाऱ्या बारमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यपींच्या सोयीसाठी काही बार, हॉटेल पहाटेपर्यंत सुरू ठेवले जात असल्याचे उघडपणे दिसत आहे.

Painted parties in the bar till dawn | पहाटेपर्यंत बारमध्ये रंगताहेत पार्ट्या

पहाटेपर्यंत बारमध्ये रंगताहेत पार्ट्या

googlenewsNext

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : पहाटेपर्यंत चालणाऱ्या बारमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यपींच्या सोयीसाठी काही बार, हॉटेल पहाटेपर्यंत सुरू ठेवले जात असल्याचे उघडपणे दिसत आहे. अशा व्यावसायिकांवर ठोस कारवाईऐवजी महिन्याला पाच हजारांचा दंड आकारून पोलिसांकडून कारवाईचा दिखावा होत असल्याचे दिसून येत आहे.
शहराच्या संस्कृतीला गालबोट लागेल असे प्रकार काही व्यावसायिकांकडून होत आहेत. त्यामध्ये बहुतांश मद्यविक्रेत्यांसह काही बार व हॉटेल व्यावसायिकांचा समावेश आहे. व्यावसायिक उद्देश साध्य करण्यासाठी त्यांच्याकडून सर्व कायद्यांची पायमल्ली होताना दिसत आहे. यामुळे शहरातल्या अनेक विभागांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. काही हॉटेल व्यावसायिकांकडून उघड्यावरच टेबल मांडून बार चालवले जात आहेत. त्यामुळे त्याठिकाणच्या रस्त्याने ये-जा करणाºया महिला, मुलींना लाजेखातर आपला मार्ग बदलावा लागत आहे. कोपरखैरणेतील क्लासिक व समुद्र हे दोन्ही बार पहाटे सहा वाजेपर्यंत चालवले जात असल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही बार रहदारीच्या मुख्य रस्त्यावर असल्याने अनेकांनी त्याची पोलिसांकडे तक्रार देखील केलेली आहे. त्यापैकी समुद्र बार ज्ञानविकास शाळेपासून काही अंतरावरच असल्याने शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना सकाळी सकाळी तळीरामांचे दर्शन घडत आहे. या प्रकाराबाबत पालकांनीही संताप व्यक्त केला आहे.
प्रवेशद्वाराचे अर्धवट शटर बंद ठेवून हे बार पहाटेपर्यंत चालवले जात आहेत. अशावेळी एखाद्याची तक्रार आल्यास सदर हॉटेल अथवा बारवर पोलिसांकडून दंड स्वरूपात पाच हजार रुपयांची पावती फाडली जाते. त्यानंतर मात्र पुन्हा पुढची तक्रार येईपर्यंत त्याठिकाणी कायद्याची पायमल्ली सुरूच असते. यामुळे प्रत्येक महिन्याला अशा बारवर एकतरी दंडाची कारवाई करून बाजू सावरण्याचा प्रकारच पोलिसांकडून सुरू असल्याचाही नागरिकांचा आरोप आहे.
पहाटेपर्यंत चालणाºया बार व्यावसायिकांकडून पोलिसांना प्रतिमहिना लाखमोलाचे सहकार्य होत असल्याची देखील चर्चा आहे. यामुळे देखील त्यांना कायद्याची पायमल्ली करण्यात पोलिसांकडून सूट मिळत असल्याची शक्यता सर्वसामान्यांकडून वर्तवली जात आहे. तर मद्यविक्री केंद्राबाहेर अथवा पाडलेल्या अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी उघड्यावर मद्यपानाला थेट उत्पादन शुल्क विभागाकडूनच छुपे पाठबळ मिळत असल्याने त्याठिकाणीही पोलिसांकडून डोळेझाक होताना दिसत आहे.
या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी मद्यपान करून परिसरात भटकणाºयांकडून गंभीर गुन्हेगारी कृत्य घडल्यानंतर झोपेचे सोंग घेणारे प्रशासन जागे होणार का? असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवाय, पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत आहे.
>उशिरापर्यंत बार चालवला जात असतानाही पकडले जाऊ नये याकरिता बिलाच्या मशिनमध्ये फेरफार केला जात आहे. काही बारमध्ये मध्यरात्री दीडनंतर बिलाची प्रिंट दिली जात नाही, तर काहींनी प्रिंट मशिनमधून वेळ हटवली आहे. काहींनी रात्री दीडनंतर प्रिंट होणाºया बिलावर वेळ छापली जाणार नाही असे फेरफार करून घेतल्याचेही समोर आले आहे.
>पहाटेपर्यंत सुरू राहणाºया बारमुळे त्याच मार्गाने सकाळच्या वेळी शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार घडण्याची शक्यता आहे. तिथले गर्दुल्ले रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर भटकत असल्याने गुन्हेगारी घटना घडण्याचीही शक्यता असते. अशा बार व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याची गरज आहे.
- मनोज म्हात्रे, कोपरखैरणे रहिवासी

Web Title: Painted parties in the bar till dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.