श्रावणसखी मंगळागौर स्पर्धेत सखींची धम्माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:16 AM2018-08-18T03:16:16+5:302018-08-18T03:16:23+5:30
लोकमत सखी मंचच्या वतीने वाशीमध्ये ‘श्रावणसखी मंगळागौर’ स्पर्धेचे आयोजन केले होते. १५० पेक्षा जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
नवी मुंबई : लोकमत सखी मंचच्या वतीने वाशीमध्ये ‘श्रावणसखी मंगळागौर’ स्पर्धेचे आयोजन केले होते. १५० पेक्षा जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या वेळी उपस्थितांनी मंगळागौरीचा आनंद घेण्याबरोबर चित्रपट कलाकारांशी संवाद साधला.
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या व देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये दुसरा क्रमांक असलेल्या नवी मुंबईकरांनी जुन्या प्रथा व परंपरा जपल्या आहेत. यामध्येच मंगळागौरीचाही समावेश आहे. भगवान शंकर व पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते. त्यांची कृपादृष्टी व्हावी यासाठी श्रावणामध्ये सर्वत्र मंगळागौर साजरी केली जाते. माता, विद्या, बुद्धी, शक्तीस्वरूपात राहणाºया देवीची उपासना करून त्यांचे गुण आपल्यामध्ये यावेत अशी आराधना केली जाते. नवी मुंंबईमधील महिलांना मंगळागौरीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देता यावे यासाठी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये ११ टीममधून १५० पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. मंगळागौरीची पारंपरिक गाणी सादर करण्यात आली.
यावेळी ‘दोस्तीगिरी’ या मराठी चित्रपटाचे कलाकार उपस्थित होते. मैत्रीवर भाष्य करणाºया या चित्रपटात अभिनेत्री पूजा मळेकर, पूजा जयस्वाल, अभिनेते विजय गीते, नितीन साळवे मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत. कलाकारांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. चित्रपटाचे दिग्दर्शक विजय शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमास माजी उपमहापौर नगरसेवक अविनाश लाड, प्रणाली लाड यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य जोशी यांनी केले.
कथ्थक विशारद योगिता कत्रे आणि नीता पाठक यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला व्ही एल सी सी हेल्थकेअर गिफ्ट पार्टनर होते.
मंगळागौर स्पर्धेतील विजेते
प्रथम : क्वीन आॅफ सखी मंच, सीवूड्स द्वितीय : ऋग्वेदी ग्रुप, वाशी
तृतीय : स्वामिनी महिला मंडळ, वाशी उत्तेजनार्थ : हिरकणी ग्रुप, कळंबोली उत्तेजनार्थ : सिद्धिविनायक ग्रुप, वाशी