पनवेलमधील सात-बारा मशिन बंद, तलाठी कार्यालयात माराव्या लागतात फे-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:49 AM2017-11-20T01:49:49+5:302017-11-20T01:49:52+5:30

पनवेल : पनवेल तहसील कार्यालयात सातबारासाठी शेतकºयांना तलाठी कार्यालयात मारावे लागतात.

Seven-twelve machines off of Panvel, Murlas have to be killed in the Talathi office | पनवेलमधील सात-बारा मशिन बंद, तलाठी कार्यालयात माराव्या लागतात फे-या

पनवेलमधील सात-बारा मशिन बंद, तलाठी कार्यालयात माराव्या लागतात फे-या

googlenewsNext

पनवेल : पनवेल तहसील कार्यालयात सातबारासाठी शेतक-यांना तलाठी कार्यालयात मारावे लागतात. हे हेलपाटे बंद करण्यासाठी एटीएमसारख्या यंत्रामधून सात-बारा देण्याचा अभिवन उपक्र म एक दीड महिन्यापूर्वी तहसील कार्यालयात सुरू करण्यात आला होता; परंतु गेल्या आठवड्याभरापासून मशिन बंद असल्याचे दिसून आले आहे.
आठवडाभरापासून सात-बारा मशिन बंद झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना पुन्हा सात-बारासाठी तलाठ्यांकडे फे-या माराव्या लागत आहेत. सात-बाराºयाच्या मशिनची किंमत १ लाख ९० हजार आहे. जनतेला सात-बाराचा उतारा सुलभ व काही मिनिटांत आॅनलाइन पद्धतीने उपलब्ध होत आहे. पनवेल तालुक्यात एकूण १७८ गावे आहेत. यातील बहुतांशी गावे डिजिटल झाली आहेत. गेल्या महिन्यापासून पनवेल तहसील कार्यालयात अवघ्या काही मिनिटांत शेतकºयांना सात-बारा हातात मिळत असे. या मशिनमुळे शेतकºयांचे हेलपाटे आणि वेळ वाचत होता. मात्र, मशिन घटकाभरच सुरू राहिली व बंद पडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
>सात-बारा मशिनमधील प्रिंटर खराब झालेले आहे. ही पब्लिक मशिन असल्यामुळे मी येथे बसू शकत नाही. धुळीमुळेही मशिन खराब होत असून क व्हर लावण्यात येणार आहे. मशिन लवकरच दुरुस्त करून सेवेसाठी सुरू करणार आहोत.
- कल्याणी कदम, नायब तहसीलदार, पनवेल.

Web Title: Seven-twelve machines off of Panvel, Murlas have to be killed in the Talathi office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.