सायन - पनवेल महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित होणार, १४ किलोमीटरची देखभाल-दुरुस्ती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:55 AM2017-10-26T01:55:17+5:302017-10-26T01:55:19+5:30

नवी मुंबई : वाशी ते बेलापूरपर्यंतचा सायन-पनवेल महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे.

Sion-Panvel Highway will be transferred to the Municipal Corporation, 14-kilometer repairs will be done | सायन - पनवेल महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित होणार, १४ किलोमीटरची देखभाल-दुरुस्ती करणार

सायन - पनवेल महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित होणार, १४ किलोमीटरची देखभाल-दुरुस्ती करणार

googlenewsNext

नवी मुंबई : वाशी ते बेलापूरपर्यंतचा सायन-पनवेल महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. हस्तांतरित झाल्यानंतर १४ किलोमीटर लांबीच्या महामार्गावरील देखभाल-दुरुस्तीचे काम पालिका करणार आहे.
राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या सायन - पनवेल महामार्गाची योग्य देखभाल केली जात नाही. पावसाळ्यात सदर महामार्गाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात. महामार्गामुळे उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल झाली असून, त्यामध्येही मनपाचा उल्ले आहे. खड्डे व डेब्रिज व बंद असलेल्या पथदिव्यांमुळे आपघात होत असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय वारंवार वाहतूककोंडी होऊन १४ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत आहे. फिफा सामन्यांदरम्यान महामार्गावरील अत्यावश्यक कामे पालिकेने केली आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, महामार्ग हस्तांतरित करून घेण्याची मागणी होऊ लागली होती.
महामार्गाची योग्य देखभाल करता यावी व नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी महामार्ग हस्तांतरित करून घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता.
सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली असून, तो पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

Web Title: Sion-Panvel Highway will be transferred to the Municipal Corporation, 14-kilometer repairs will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.