भूखंडांची वाटपपत्रे वितरणासाठी विशेष कॅम्प, सिडकोची मोहीम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:35 AM2017-09-15T06:35:52+5:302017-09-15T06:36:06+5:30

विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाºया दहा गावांच्या स्थलांतर प्रक्रियेने गती घेतली आहे. स्थलांतरासाठी आता १ आॅक्टोबरपासूनची नवीन डेडलाइन देण्यात आली आहे.

 Special camp for the distribution of plots, CIDCO campaign | भूखंडांची वाटपपत्रे वितरणासाठी विशेष कॅम्प, सिडकोची मोहीम  

भूखंडांची वाटपपत्रे वितरणासाठी विशेष कॅम्प, सिडकोची मोहीम  

googlenewsNext

नवी मुंबई : विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाºया दहा गावांच्या स्थलांतर प्रक्रियेने गती घेतली आहे. स्थलांतरासाठी आता १ आॅक्टोबरपासूनची नवीन डेडलाइन देण्यात आली आहे. त्यानुसार सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रकल्पबाधितांना त्यांच्या भूखंडांचे निवाडे तथा वाटपपत्रे घेणे सोयीचे व्हावे याकरिता गुरुवारपासून विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
विमानतळपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रातील दहा गावांचे स्थलांतर केले जाणार आहे. स्थलांतरित होणाºया जवळपास ३000 कुटुंबीयांना पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत पर्यायी भूखंड देण्यात आले आहे. या भूखंडाची वाटपपत्रे देण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. सुमारे २९५0 भूखंडांची वाटपपत्रे वितरित करायचे होते. त्यासाठी पनवेल मेट्रो सेंटरमध्ये विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून आतापर्यंत २५00 बांधकामधारकांना वाटपपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित वाटपपत्रांचे वितरण करण्यासाठी गुरुवारपासून पुन्हा कॅम्प सुरू करण्यात आले आहेत.
स्थलांतरित होणाºया दहा गावांतील संपादित जमिनीचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कार्यालयाने ९१३ निवाडे तथा वाटपपत्रे जाहीर केले आहेत. त्यापैकी ६१४ वाटपपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित ३00 निवाड्यांचे वाटप या कॅम्पच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. १४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत विविध गावांत चौदा कॅम्प घेतले जाणार असून प्रकल्पग्रस्तांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने केले आहे.
 

Web Title:  Special camp for the distribution of plots, CIDCO campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.