FIFA World Cup 2018: सर्बियाची कोस्टा रिकावर 1-0 ने मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 07:39 PM2018-06-17T19:39:08+5:302018-06-17T20:07:40+5:30
कर्णधार अलेक्झांडर कोलोरोवचा फ्री कीकवर अप्रितम गोल
समारा: फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी सर्बियाच्या संघाने कोस्टा रिकाचा 1-0 अशा गोल फरकाने पराभव केला. विश्वचषकाच्या ग्रुप ई मधली ही पहिलीच लढत होती. सर्बियाचा कर्णधार अलेक्झांडर कोलोरोव याने दुसऱ्या सत्रात मिळालेल्या फ्री कीकवर अप्रतिम गोल केला. याच गोलच्या जोरावर सर्बियाने आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यश मिळवले. ग्रुप ई मध्ये सर्बिया, कोस्टा रिकासह ब्राझील आणि स्वित्झर्लंडचा समावेश आहे. त्यामुळं सर्बियासाठी हा विजय फारच महत्त्वाचा आहे.
तत्पूर्वी पहिल्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, तुलनेत सर्बियाच्या संघाचे चेंडूवर जास्त वेळ नियंत्रण राहिले. कोस्टा रिकाच्या तुलनेत त्यांना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र, त्यांना या संधीचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही. तर दुसरीकडे कोस्टा रिकाच्या खेळाडूंमध्ये सुसूत्रता नसल्यामुळे त्यांचा आक्रमणात तितकीशी धार दिसून आली नाही. दुसऱ्या सत्रातील शेवटच्या काही मिनिटांमध्ये कोस्टा रिकाच्या खेळाडुंनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. या प्रयत्नात काही खेळाडुंकडून धसमुसळा खेळही झाला. त्यामुळे कोस्टा रिकाच्या दोन खेळाडुंना पंचांनी पिवळे कार्ड दाखवले.
STATS // #CRCSRB#WorldCuppic.twitter.com/iA8BZhxUvt
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 17, 2018