भुवनेश्वरमध्ये होणार हॉकी विश्वचषक

By admin | Published: March 28, 2017 01:12 AM2017-03-28T01:12:54+5:302017-03-28T01:12:54+5:30

भारतात होणाऱ्या विश्व लीग २०१७ आणि पुरुष विश्वचषक २०१८ स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भुवनेश्वरला

Hockey World Cup to be held in Bhubaneswar | भुवनेश्वरमध्ये होणार हॉकी विश्वचषक

भुवनेश्वरमध्ये होणार हॉकी विश्वचषक

Next

भुवनेश्वर : भारतात होणाऱ्या विश्व लीग २०१७ आणि पुरुष विश्वचषक २०१८ स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भुवनेश्वरला मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आणि ओडिशा सरकारने अशी अधिकृत घोषणा केली. येथील कलिंगा स्टेडियम हॉकीतील दोन मोठ्या स्पर्धांचे आयोजन करणार आहे. या मैदानावर २०१४ मध्ये हॉकी चॅम्पियन्स लीग यशस्वी ठरली होती. पुरुष विश्व हॉकी फायनल भुवनेश्वर ही १ ते १० डिसेंबरपर्यंत असेल. यामध्ये यजमानांसोबत जगातील सर्वश्रेष्ठ आठ संघांचे स्वागत केले जाईल, जे हॉकी विश्व लीग सेमीफायनलमधून पात्रता मिळवतील.‘एफआयएच’ने दिलेल्या माहितीनुसार, पुरुष हॉकी विश्वचषक नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला होईल. ज्यात यजमान भारतासोबत १५ संघ असतील.

Web Title: Hockey World Cup to be held in Bhubaneswar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.