पत्नीच्या फोटोवरुन ट्रोलिंग करणा-यांना इरफान पठाणचं चोख उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 10:55 AM2017-07-20T10:55:50+5:302017-07-20T10:56:38+5:30
इरफान पठाणने पत्नीसोबत फोटो शेअर केल्यानंतर नखांना लावलेलं नेलपॉलिश, अर्धवट झाकलेले हात यामुळे त्याच्या चाहत्यांनी ट्रोल केलं होतं
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज इरफान पठाणने आपली पत्नी सफा बैगसोबत एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता, ज्यानंतर ट्विटरकरांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणा-या इरफान पठाणने टिकाकारांना अत्यंत शांतपणे सणसणीत उत्तर दिलं आहे. इरफान पठाणने पत्नीसोबत फोटो शेअर केल्यानंतर नखांना लावलेलं नेलपॉलिश, अर्धवट झाकलेले हात यामुळे त्याच्या चाहत्यांनी ट्रोल केलं होतं. तू पठाण आहेस, आणि एका पठाणाने आपल्या पत्नीसोबतचे असे फोटो टाकणं गैर असल्याचं इरफानच्या चाहत्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं होतं. काहीजणांनी तर हे सर्व इस्लामविरोधी असल्याचं सांगितलं होतं.
सौदीत मिनी स्कर्ट घालून फिरणाऱ्या मुलीला शिक्षा देण्याची मागणी
मात्र इरफान पठाणने टिकाकारांना आपल्या शैलीत उत्तर देत शांत केलं आहे. इरफानने बुधवारी ट्रोलिंग करणा-यांना उत्तर देत एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोखाली कॅप्शन दिली आहे की, "मी पुन्हा सांगतो, जर प्रेमापेक्षा जास्त द्वेष होत असेल तर तुम्ही अत्यंत योग्य करत आहात".
I repeat :) If there is more love than hate I think we are doing alright. #spreadlovepic.twitter.com/oEHsXqkEI4
— Irfan Pathan (@IrfanPathan) July 19, 2017
इरफान पठाणला ट्रोलिंगचा सामना करावा लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याच्या चाहत्यांनी अनेकदा इस्लामची शिकवण देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र इरफान पठाणने टिकाकारांकडे दुर्लक्ष देत आपलं म्हणणं योग्यप्रकारे मांडत उत्तर दिलं आहे.
Kuch to log kahenge logo ka kaam hai kehna but always #love#travelpic.twitter.com/aERzXr0g2j
— Irfan Pathan (@IrfanPathan) July 17, 2017
मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात इरफान आणि सफा यांनी लग्न केलं. इरफानची पत्नी सफा ही सौदी अरेबियातल्या जेहाद या शहरातली आहे. नुकताच सफाने मुलाला जन्म दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इरफान पठाण आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. आयपीएलच्या गेल्या सत्रात इरफानने गुजरातच्या संघाचं प्रतीनिधित्व केलं होतं.
शामीवरही झाली होती टीका
काही दिवसांपुर्वी भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने फेसबूक आणि ट्टिवरवर आपली पत्नी आणि मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावरुन शामीला धर्म आणि संस्कृतीच्या रक्षकांकडून टीकेचा सामना करावा लागला होता. शामीच्या पत्नीने घातलेल्या कपड्यांवरुन टीका करत पुढच्या वेळी हिजाब परिधान करुन फोटो काढण्याचा सल्ला देण्यात आला होता. काही लोक तर शामीला आपल्या पत्नीला ताब्यात ठेवायला जमत नसल्याचंही बोलले होते. तर काहींनी शामीच्या मुसलमान होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.