लोकपुरम संघाची दमदार आगेकूच!

By admin | Published: May 19, 2015 01:23 AM2015-05-19T01:23:09+5:302015-05-19T01:23:09+5:30

लोकपुरम स्कूलने सिंघानिया चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ फेरीमध्ये बलाढ्य गुंडेचा स्कूलचा ७ विकेट्सने धुव्वा उडवून दमदार आगेकूच केली.

Lokapuram team's strong advances! | लोकपुरम संघाची दमदार आगेकूच!

लोकपुरम संघाची दमदार आगेकूच!

Next

मुंबई : प्रतीक अपसिंघेच्या तडाखेबंद नाबाद ८९ धावांच्या जोरावर लोकपुरम स्कूलने सिंघानिया चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ फेरीमध्ये बलाढ्य गुंडेचा स्कूलचा ७ विकेट्सने धुव्वा उडवून दमदार आगेकूच केली. अन्य एका सामन्यात यजमान सिंघानिया स्कूलने सहज आगेकूच केली.
सुलोचनादेवी सिंघानिया
स्कूलच्या वतीने सुरू असलेल्या या स्पर्धेत नाणेफेक जिंकून गुंडेचा संघाने प्रथम फलंदाजी करताना लोकपुरम समोर विजयसाठी ३० षटकांत
१८९ धावांचे आव्हान उभे केले. सूर्यांश शेडगे (६०) आणि नाहूश पाटील
(६४) यांनी आक्रमक फलंदाजी
करताना संघाला आव्हानात्मक
मजल मारून दिली. सोहम पिटकरने २८ धावांत २ बळी घेताना गुंडेचाला रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर धावांचा पाठलाग करताना लोकपुरम संघाने आक्रमक सुरुवात करताना गुंडेचा संघाची गोलंदाजी फोडून काढली. तत्पूर्वी झालेल्या अन्य एका सामन्यात यजमान सिंघानिया स्कूल संघाने सहज विजय मिळवताना सरस्वती स्कूल मराठी संघाचा ७ विकेट्सने फडशा पाडला. आर्यमन पवार (३/१६), कुनिक नायर (२) आणि सुजीत काणे (२) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर सिंघानिया संघाने सरस्वती संघाला ३० षटकांत ९ बाद १३७ असे रोखले. यानंतर विराज गोसावी (नाबाद ३७), प्रिथ्विक पंडित (नाबाद २९) आणि दिशान
राणे (२८) यांच्या जोरावर सिंघानिया संघाने ३ फलंदाजांच्या मोबदल्यात
१८ षटकांतच विजय मिळवला.
(क्रीडा प्रतिनिधी)

प्रतीक अपसिंघे याने जबरदस्त पिटाई करताना लोकपुरमच्या विजयात मोलाचे योगदान दिले. ओमकार सावर्डेकरनेदेखील मोक्याच्या वेळी २५ धावा काढताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तोषीवालने २२ धावांत २ बळी घेत लोकपुरमला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. लोकपुरमने प्रतीकच्या जोरावर २३.५ षटकांतच ३ बाद १९३ धावा फटकावल्या.

Web Title: Lokapuram team's strong advances!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.