LMOTY 2019: कुस्तीच्या आखाड्यात तिरंगा फडकवणारा मराठमोळा राहुल आवारे ठरला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 07:00 PM2019-02-20T19:00:20+5:302019-02-21T17:11:48+5:30

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुलने भारताला ५७ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक जिंकून दिले.

Lokmat Maharashtrian of the Year 2019: Rahul Aaware wins Best sportsperson Award | LMOTY 2019: कुस्तीच्या आखाड्यात तिरंगा फडकवणारा मराठमोळा राहुल आवारे ठरला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

LMOTY 2019: कुस्तीच्या आखाड्यात तिरंगा फडकवणारा मराठमोळा राहुल आवारे ठरला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

Next

मुंबई : जर तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर कुणी कितीही तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला, तरी तुमची गुणवत्ता लोकांपुढे आल्यावाचून राहत नाही. कुस्तीच्या आखाड्यात त्याने प्रचंड मेहनत करून घाम गाळला. पण दिल्ली दरबारी त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. पण जेव्हा  २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळण्याची राहुलला संधी मिळाली आणि त्याने भारताला ५७ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक जिंकून दिले. ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राहुल आवारेची. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने राहुलचा सन्मान करण्यात येत आहे. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात राहुल आवारेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

'रूस्तम-ए-हिंद' हरिश्चंद्र उर्फ मामा बिराजदार आणि अर्जन पुरस्कारविजेते मल्ल काका पवार यांचा शिष्य असलेल्या राहुलने सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले ते २००८ मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत. या स्पर्धेत त्याने प्रतिस्पर्ध्यांना सहजपणे नमवून सुवर्णपदकाला गवसणी घातली. तेव्हापासून तर मागील वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णयशापर्यंतचा विचार करता राहुलने विविध पातळ्यांवर सर्वोच्च यश मिळवले आहे. 

राहुलने  २००९ मध्ये धडाकेबाज कामगिरी केली. उझबेकिस्तानमध्ये झालेल्या ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षी जर्मन ग्रां-प्रीमध्येही त्याने सर्वोच्च यश संपादन केले. जागतिक ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत रौप्य आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून राहुलने २००९ हे वर्ष अविस्मरणीय केले. २०१० ला गोल्डन  ग्रां-प्रीत कांस्यपदक जिंकल्यानंतर २०११ मध्ये मेलबोर्न राष्ट्रकुल स्पर्धेत राहुलने सिनियर गटात दिग्गज प्रतिस्पर्ध्यांना लोळवून सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. याच वर्षी एशियन चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्यपदकही मिळवले. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेत राहुलने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याबद्दलच 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. 

हे होतं परीक्षक मंडळ

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.   

Web Title: Lokmat Maharashtrian of the Year 2019: Rahul Aaware wins Best sportsperson Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.